32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात कोरोनाचे व्दिशतक

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे व्दिशतक

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोनाचा वाढता आलेख कायमच असून सोमवार आलेल्या कोरोनाने व्दिशतक कायम ठेवले आहे.या अहवालानुसार २०८ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. परंतू एकाही रूग्णाचा मृत्यु झाला नाही. कोरोनाने गेल्या काही दिवसापासून नांदेडकरांची चिंता वाढविली आहे.सोमवारच्या नव्या २०८ रूग्णात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ९५ तर अ‍ॅटिजेन किट्स तपासणीद्वारे ११३ बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या १०४ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या १ हजार ८४ अहवालापैकी ८४५ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २४ हजार ७४६ एवढी झाली असून यातील २२ हजार ९२२ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण १ हजार ३ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील २३ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविडमुळे जिल्ह्यातील ६०६ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी १, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण ६४, देगलूर कोविड रुग्णालय २, मुखेड कोविड रुग्णालय १, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ३, माहूर तालुक्याअंतर्गत १२, खाजगी रुग्णालय १७, किनवट कोविड रुग्णालय ४ असे एकूण १०४ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९२.६२ टक्के आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ८३, अधार्पूर तालुक्यात १, धमार्बाद १, कंधार ३, हिंगोली १, नांदेड ग्रामीण १, बिलोली १, हदगाव २, परभणी १, यवतमाळ १ असे एकूण ९५ बाधित आढळले.

आजच्या बाधितांमध्ये अ‍ॅन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ९९, देगलूर तालुक्यात २, कंधार १, किनवट २, नांदेड ग्रामीण ३, हदगाव ३, मुखेड २, परभणी १ असे एकूण ११३ बाधित आढळले. जिल्ह्यात १ हजार ३ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे ५४, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ७१, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) ६४, किनवट कोविड रुग्णालयात ३५, मुखेड कोविड रुग्णालय ९, हदगाव कोविड रुग्णालय ८, महसूल कोविड केअर सेंटर ६८, देगलूर कोविड रुग्णालय ४, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण ४१८, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण १७२, खाजगी रुग्णालय १०० आहेत. सोमवार ८ मार्च २०२१ रोजी ५ वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे १३४, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे १५ एवढी आहे.

संचारबंदी शिथील होताच बाजारपेठ, बँकांत गर्दी!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या