24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeनांदेडवीस गावे,वाडीतांड्यांना स्मशानभूमी मिळेना

वीस गावे,वाडीतांड्यांना स्मशानभूमी मिळेना

एकमत ऑनलाईन

हाणेगाव: गेल्या अनेक वर्षापासून हाणेगाव विभागातील किमान वीस ते तीस गाव व तांड्यामध्ये एकही स्मशानभूमी नसल्याने नातेवाईकाच्या मरणानंतर येथील गावकºयांना मरणयातणा सहन कराव्या लागता आहेत़याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.

हानेगाव हे गाव कर्नाटक आंध्रप्रदेश व महाराष्ट्र या तीन राज्याच्या सीमेवरील देगलूर तालुक्यातील सर्वात मोठे जिल्हा परिषदेचे सर्कल आहे़ या सर्कल अंतर्गत किमान सोळा ते सतरा गावे व नऊ ते दहा तांड्याचा विभाग असून हा विभाग प्रत्येक वेळेस प्रत्येक बाबीमध्ये दुर्लक्षित राहिला असेच म्हणावे लागेल़ हानेगाव विभागाने अनेक खासदार, आमदार, जि.प.सदस्य निवडून दिले व अनेक सरपंच अनेक सदस्य दिले.

पण यामधील कोणताही लोकप्रतिनिधीने स्मशानभूमिला प्राध्यान्य दिले नाहीग़ेल्या पन्नास ते साठ वर्षच्या काळात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर बनला आहे़ या विभागामध्ये अनेक ग्रामपंच्यायती हे मोठ्या लोकसंख्येच्या आहेत़त्यांना शासकीय निधी सुद्धा चांगला मिळतो पण विकास कामाच्या यादीतून स्मशानभूमीचा प्रश्न हा नेहमी बाजूला सारला गेला आमदार निधी,खासदार निधी,जि.प.सदस्य निधी(डी.पी.टी.सि.) चौदावा वित्त आयोग व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत अशा अनेक निधीतून स्मशानभूमी उभारता येते पण याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

काही गावच्या स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ते नाहीत अनेक ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागाच नाही ़यामुळे जागा मिळेत तेथे मृत व्यक्तिवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत़ तर जागेसह इतरसुविधा ही नसल्याने मरणानंतरही मरणयातना सहन कराव्या लागत आहेत,अशी प्रतिक्रीया गावक-यांमधून उमटत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या