24.7 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeनांदेडदोन बोटी जिलेटिनने नष्ट,एक बोट जप्त

दोन बोटी जिलेटिनने नष्ट,एक बोट जप्त

एकमत ऑनलाईन

नांदेड : गेल्या काही दिवसापासून वाळू माफियांवर लगाम घालण्यास जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी कडक भुमिका घेतली आहे. तहसीलच्या पथकाने दि. २६ ऑक्टो.रोजी रात्री पुणेगाव, पिंपळगाव मिश्री व किकी गोदावरी पात्रात पथकाने धडक कारवाई करित बोटी पकडल्या.रात्रीची वेळ असून जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी स्वत: घटनास्थळी भेट दिली.दुस-या दिवशी दि.२७ रोजी वाळू उपसा करणा-या दोन बोट जिलेटिनने उडवून नष्ट केल्या तर एक बोट जप्त करण्यात आली.या कारवाईने वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

काही दिवसापुर्वी सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदी तुंडूब भरून वाहत होती.मात्र पाणी ओसरताच वाळू माफिया अवैधरित्या उपसा करण्यासाठी सक्रिय झाले होते.यामुळे नदी पात्रात तराफ्यांची जत्रा दिसून येत होती.याची जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी गंभीर दखल घेत धडक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.तेव्हापासून कारवाई सुरू झाली आहे. नायब तहसीलदार मुगाजी काकडे यांचे पथक दि.२६ रोजीवरील गावात गेली होते. त्या ठिकाणी गोदावरी पात्रात बोटीद्वारे अवैध वाळू उपसा होत होता. याबाबत काकडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व उपविभागीय अधिकारी पठाण यांना ही माहिती दिली.

तेव्हा रात्रीची वेळ असूनही जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर व उप विभागिय अधिकारी लतीफ पठाण हे स्वत: पिंपळगाव मिश्री येथे पोहचले.यावेळी वाळू उपसा करणा-या बोटी पाण्यात असल्याने व अंधार असल्याने त्यांनी दुस-या दिवशी दि.२७ रोजी कारवाई कारण्याचे सांगितले होते.या आदेशानुसार २ बोटी पाण्यातच जिलेटीन लावून नष्ट केल्या.१ बोट जप्त करून तहसिल कार्यालयात जमा केली तर १ बोट पाण्यात बुडवून ठेवल्यामुळे त्यावर कारवाई करने शक्य झाले नाही.

आहे या कारवाईत मंडळ अधिकारी कोंडीबा नागरवाड, अनिरुद्ध जोंधळे, अनिल धुळगंडे, खुशाल घुगे , चंद्रशेखर सहारे तलाठी ,आकाश कांबळे, ईश्वर मंडगीलवार, संताजी देवापूरकर , सचिन नरवाडे, मंगेश वांगीकर, विजय रनविरकर ,राहुल चव्हाण ,कैलाश सूर्यवंशी मनोज देवणे, विजय अहिरराव यांनी सहभाग घेतला.यावेळी पोलीस स्टेशन ग्रामीण यांनी पोलीस बंदोबस्त दिला. महसूल प्रशासन जरी कामात व्यस्त असले वाळू माफियांवर तेवढेच लक्ष ठेवून आहे. यापुढे ही दंडात्मक व फोजदारी कारवाई चालू राहील असे तहसीलदार किरण आंबेकर यांनी सांगितले.

विद्यापीठातील अधिकारी-कर्मचा-यांचे आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या