नांदेड : प्रतिनिधी
शहरात मागच्या काही महिण्यापासून गुन्हेगारी वाढत चालली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातही गुन्हेगार सर्रापणे वापर करत असून, असे असताना वसरणी भागातून दोघांना बेकायदेशीर हत्यार बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहर व परिसरात गुन्हेगारांची दहशत वाढत चालली आहे, कधी शस्त्राचा धाक दाखवून लूटमार तर कधी खंडणीसाठी व्यापा-यांना धमकी असे प्रकरण दररोज घडत आहे. अनेक गुन्हेगार बेकायदेशीर गावठी कट्टा, खंजिर, तलवार यासारखी हत्यार बाळगत फिरत आहेत. त्यामुळे पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी बेकायदेशीर हत्यार बाळगणा-यांविरूद्ध कारवाई करण्याचे आदेशीत केले होते. मागच्या महिना भरात शहर व परिसरातून पोलिसांनी खंजिर, गावठी पिस्टल, तलवार यासारखे हत्यार जप्त केली मात्र तरीही शहरात बेकायदेशीर हत्यार बाळगणा-यांच्या संख्येत वाढत आहे.
दि.२४ रोजी ग्रामीण पोलीस मध्यरात्री वसरणी भागात गस्त करीत असताना त्यांना दोन संशयीत दिसून आले, त्यांना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यापैकी एकाजवळ बेकायदेशीर खंजिर मिळून आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेवून त्यांच्याविरूद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोहेकॉ शेख जावेद हे करीत आहेत.