नांदेड : प्रतिनिधी
नायगाव तालुक्यातील ईकळीमाळ येथे गायराण जमिनीवर फलक लावण्याच्या कारणावरुन दोन गटामध्ये बाचाबाची झाल्याची घटना घडली असून, या घटनेमुळे काही काळ गावामध्ये तणाव निर्माण झाला़ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून जमावाला शांत केले आहे़ सदर घटना रविवारी दुपारी घडली.
कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ईकळीमाळ येथे गेल्या काही दिवसापासून गायराण जमिनीचा वाद सुरु आहे़ सदर जमिनीवर वंचित बहुजन आघाडीचा फलक लावण्यासाठी कार्यकर्ते रविवारी दुपारी जमा झाले होते. यावरुन दोन गटामध्ये बाचाबाची झाली़ यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक पुरी यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी व प्रतिष्ठीत नागरिकांनी समजावून सांगीतले़ याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिस निरीक्षक पुरी यांनी सांगितले.