24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeनांदेडबिलोलीत मंडळ अधिका-यांकडून दोन हायवा जप्त!

बिलोलीत मंडळ अधिका-यांकडून दोन हायवा जप्त!

एकमत ऑनलाईन

बिलोली : तालुक्यातील हुनगुंदा येथील वाळू घाटातून अवैद्यरित्या वाळू वाहतूक करणा-या दोन हायवा मंडळ अधिका-यांनी रविवारी (दि. २९) सकाळी सात वाजता जप्त केल्या. तहसिल कार्यालयातील नियुक्त महसुल पथकामधील कुंडलवाडीचे नवनियुक्त मंडळ अधिकारी एल.बी. अंबेराव यांच्यासह पथकातील या हायवा जप्त करून कुंडलवाडी पोलिसांच्या ताब्यात दिल्या.

बिलोली तालुक्यात सुमारे १४ वाळू घाट सुरु आहेत. सर्वच घाटावर जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियम अटींची पायमल्ली होत आहे. सर्वच घाटावर मान्यता नसलेल्या जेसीबी, पोकलेन यंत्रांचा वापर होत आहे. इन्व्हाईस नोंद नसलेल्या पावत्यांचा वापर वाहतुकीसाठी होत आहे.

अशातच हुनगुंदा येथील वाळू घाटावरुन काही हायवा अरिरिक्त वाळू भरून निघाल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यात अवैध विनारॉयल्टी असलेल्या दोन हायवांवर (क्र.एम.एच २६ बी.ई.१६१४ आणि एम.एच. २६ बीई ४०८७) कारवाई करण्यात आली. तीन महिन्यांपासून अवैध वाळू उत्खनन सुरू असताना पहिल्यांदाच महसूल प्रशासनाने ही कारवाई केली आहे. ही वाहने एका राजकीय पक्षाच्या

पदाधिका-याची असल्याची चर्चा आहे. याआधी सगरोळी येथील वाळू घाटावर पाच जेसीबी व ३८ गाड्या अशाच प्रकारे पकडण्यात आल्या होत्या. मात्र, नंतर कोणतीही कारवाई न करता ती वाहने सोडून देण्यात आली होती. आता यावेळी बिलोलीचे तहसिलदार श्रीकांत निळे हे कोणती कारवाई करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या