21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडकृष्णा एक्सप्रेसने दोनशे शेळ्या-मेंढ्यांना चिरडले

कृष्णा एक्सप्रेसने दोनशे शेळ्या-मेंढ्यांना चिरडले

एकमत ऑनलाईन

धर्माबाद : शहरापासून पंधरा किलोमीटरवर असलेल्या व तेलंगणा राज्यातील बासर तीर्थक्षेत्रा पासून अवघ्या पाच किलोमीटरवर असणा-या फकीराबाद रेल्वे स्थानकादरम्यान काल मध्यरात्री कृष्णा एक्स्प्रेसने जवळपास दोनशे शेळ्या व मेंढ्याना चिरडण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून सदरील घटना शुक्रवारी पहाटे घडली.

तेलंगणा राज्यातील नवीपेठ मंडळमध्ये येत असलेल्या फकीराबाद रेल्वे स्थानका दरम्यान मध्यरात्री मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे रेल्वे ट्रॅकवर शेळ्या मेंढ्या थांबल्या होत्या. मेंढपाळांना रेल्वे गाडी येण्याचा अंदाजच नव्हता. तेवढ्यात सुसाट वेगाने कृष्णा एक्सप्रेस आली आणि सर्व शेळ्या-मेंढ्यांना चिरडून निघून गेली. सदरील घटनेमुळे त्या मेंढपाळांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून रेल्वे प्रशासनाने आर्थिक मोबदला देण्यात यावा अशी मागणी होत आहे.

ऑनलाईन शिक्षणाबाबतीत नियोजनाचा अभाव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या