22.9 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडव-हाडाचा टेम्पो उलटून दोन ठार; ५० जण गंभीर

व-हाडाचा टेम्पो उलटून दोन ठार; ५० जण गंभीर

एकमत ऑनलाईन

मुखेड : उदगीर तालुक्यातील हाळी येथील व-हाड कार्ला येथे जाणारा टेम्पो मुखेड शहरापासून आठ कि.मी.अंतरावर असलेल्या भारत वीज निर्मिती केंद्र समोर उलटला.यात एक जण जागीच ठार तर दुस-याचा नांदेड येथे उपचाराला नेत असताना मृत्यू झाला.तर या अपघातात जवळपास पन्नास जण जखमी झाले आहेत. सदर घटना मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

उदगीर तालुक्यातील हाळी येथील नरसिंग सोनकांबळे यांच्या मुलाचा विवाह कार्ला ता.बिलोली येथील विजय वाघमारे यांच्या मुलीशी मंगळवारी संपन्न होणार होता. त्या अनुषंगाने हाळी येथून सकाळी लवकरच व-हाड कार्ला या गावाच्या दिशेने निघाले. मुखेड शहर ओलांडल्यानंतर अतिशय वेगाने टेम्पो चालवीत असलेल्या टेम्पो सकाळी साडे दहाच्या सुमारास चालकाचा ताबा सुटला . एम.एच.०४-ई.बी. ३५२५ हा टेम्पों ईंद भारत वीजनिर्मिती केंद्र समोर उलटला.यावेळी टेम्पोच्या टपावर बसून प्रवास करणा-या काही तरुणांनी टेम्पो उलटणार या भीतीने चालत्या टेम्पो वरून उड्या मारल्या त्यातही अनेक जण गंभीर जखमी झाले.प्राप्त माहितीनूसार या अपघातात जवळपास ५० जण जखमी झाले आहेत.यातील गंभीर ३० जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटना घडताच मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी जाऊन अतिगंभीर रुग्णांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात हलविले पाहता-पाहता इतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका ही घटनास्थळी बोलवण्यात आल्या व काही वेळातच सर्व जखमींना मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेचा घटनास्थळीच प्रशांत जनार्दन सूर्यवंशी रा.हाळी (वय ३०) यांचा जागीच मृत्यू झाला तर नांदेड येथे उपचारासाठी नेत असताना एकाचा मृत्यू झाला असून वृत्त लिहीपर्यंत त्यांचे नाव कळू शकले नाही.

पॅराडाईजचे मधील ग्राहक जेलमध्ये तर बारबालासह मॅनेजर वेटर चालक जामीनावर मुक्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या