27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeनांदेडनाकाबंदीत दोन पिस्टलसह काडतूस जप्त

नाकाबंदीत दोन पिस्टलसह काडतूस जप्त

एकमत ऑनलाईन

नांदेड : पोलिसांच्या ऑल आऊट ऑपरेशनच्या नाकाबंदी दरम्यान एका संशयीत गुन्हेगारास पकडण्यात आले. या गुन्हेगाराकडून दोन पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केली.

पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी दिनांक २७ जुलै रोजी लावलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदी दरम्यान पोलीस स्टेशनमधील अभिलेखावरील गुन्हेगारांना चेक करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस स्टेशन शिवाजीनगर येथील पोलिस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने आरोपी चेकिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आण्णाभाऊ साठे चौकात सापळा रचून जबरी चोरीचे प्रयत्नात प्राणघातक हत्यारासहीत असलेला संशयीत आरोपी तेजिंदरसिंग मोहनसिंग टप्पेवाले वय २३ वर्ष, रा. सखोजीनगर यास ताब्यात घेतले.

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त केले. सदर कामगीरी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख व पोलिस निरीक्षक डॉ. नितीन काशिकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रभारी सपोनि रवी वाहुळे, पोउपनि मिलिंद सोनकांबळे, पोहेकॉ इब्राहिम, पोना रवि बामणे, पोना दिलीप राठोड, पोशि देविसिंग सिंगल, पोशि शेख अझहर व पोशि दत्ता वडजे यांनी कामगिरी पार पाडली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या