24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeनांदेडमन्याड नदी पात्रात दोन विद्यार्थ्यांच्या बुडून मृत्यू

मन्याड नदी पात्रात दोन विद्यार्थ्यांच्या बुडून मृत्यू

एकमत ऑनलाईन

कंधार : हबिब सय्यद

शहराजवळील मन्याड नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्याचा अंदाज न आल्याने व पोहता कमी येत असल्याने नदीपात्रात बूडून मृत्यू झाल्याची घटना दि.२२ रोजी रविवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की सतीष संभाजीराव लोखंडे वय ४० वर्षे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सौरभ सतिष लोखंडे वय १६ वर्षे व त्याचा मित्र ओम राजू काजळेकर वय १५ वर्षे रा. गवंडीपार कंधार हे स्वप्निल पाटील लुंगारे यांचे शेताच्या दक्षिणेस तीन किलोमीटर अंतरावर कंधार शिवारात मन्याड नदिचे पात्रात पाण्यात पोहण्यासाठी गेले होते ते पोहत असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने व कमी पोहता येत असल्याने व पात्रात गाळ असल्याने पाण्यात बुडाले आहेत अशी माहिती त्यांचे सोबत असनारा मुलगा बालाजी तुकाराम डांगे रा. लुंगार गल्ली कंधार याने आम्हाला घरी येउन कळवील्याने तात्काळ त्या ठिकाणी गेलो तेव्हा तेथे राजू काजळेकर हे देखिल आले.

त्या नंतर आम्ही व परमेश्वर बालाजी चौधरी, कृष्णा बालाजी चौधरी दोघे रा. गवंडीपार कंधार, लक्ष्मण गुंडप्पा जोतकर रा. मुक्ताईनगर कंधार यांचे मदतीने दोन्हीही मुलांचा मन्याड नदीचे पात्रात शोध घेउन दोघांचीही मृतदेह नदी पात्रातुन बाहेर काढली आहे. सौरभ पि. सतिष लोखंडे व ओम राजू काजळेकर मन्याड नदिचे पात्रात पोहण्यासाठी गेले होते ते पोहत असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने व कमी पोहता येत असल्याने व पात्रात गाळ असल्याने पाण्यात बुडून मरण पावले अशी माहिती एका मयत विद्यार्थ्याचे वडील सतीश लोखंडे यांनी दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक आर एस पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली स.उप.पो.नि. आर यु गणाचार्य हे करीत आहे कंधार ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात दिल्यानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या