23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeनांदेडनांदेड येथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात दोन चोरटे पकडले

नांदेड येथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात दोन चोरटे पकडले

एकमत ऑनलाईन

नांदेड : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरण्यासाठी आलेल्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. या चोरट्यांकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दि. ८ ऑगस्ट रोजी नांदेडला आले होते. त्यांचा एक कार्यक्रम भक्ती लॉन्स येथे आयोजित करण्यात आला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. पोलिस प्रमुख प्रमोद शेवाळे यांच्या नेतृत्वात येथे प्रचंड पोलिस ताफा तैनात करण्यात आला होता. या कार्यक्रमातील गर्दीत दोन मोबाईल चोरटे आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखाचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या नेतृत्वात कार्यरत पथकास मिळाली. पथकाने या दोघांना ताब्यात घेत चौकशी केली.

यानंतर त्यांच्याकडून चोरलेले दोन मोबाईल किंमत २९ हजार रुपयांचे जप्त केले. स्थागुशा पथकाच्या कामगिरीने भाग्यनगर पोलिस ठाण्यातील चोरीचा गुन्हा क्रमांक २७५/२०२२ उघडकीस आला आहे. या पोलिस पथकात सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने, पोलिस उपनिरीक्षक गोविंद मुंडे, पोलिस अंमलदार घुगे, संजीव जिंकालवाड, गंगाधर कदम, विलास कदममगणेश धुमाळ, शिंदे यांचा समावेश होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या