26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeनांदेडउमरी तालुक्यातील दोन गावांचा संपर्क तुटला

उमरी तालुक्यातील दोन गावांचा संपर्क तुटला

एकमत ऑनलाईन

उमरी : गेल्या दोन दिवसापासून उमरी तालुक्यासह उमरी शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती शुक्रवारी मध्यरात्री उमरी शहरात व तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

या पावसामुळे उमरी तालुक्यातील मोजे बोळसा गंगा पट्टी या गावचा संपर्क तुटला तर कुदळा बोळसा और बीच पातळीने वाहत आहे तसेच मोजे शिवणगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये पाणी शिरले व शाळेच्या मागच्या घरामध्ये देखील पाणी शिरले आहे तर मोजे कळगाव येथे अति मुसळधार पाऊस पडत असून सावरगाव रोड वरील वहळाला पूर आला आहे.

वहळाला लगतची संपूर्ण शेती पाण्याखाली गेले आहे शेतातील संपूर्ण पिक पाण्यात वाहून गेले आहे भोकर ते कळगाव रस्त्याच्या फुलला मोठे मोठे भेगा पडले असून फुलाची उंची कमी असल्यामुळे पुराच्या पाण्यामुळे पूर्ण रोड खरडून जात आहे भोकर कळगाव रस्ता संपूर्ण फुल खराब झाला आहे.

मोजे शिरूर येथे बीए एन सी च्या फुलावरून पाणी पाहून गावांमध्ये जाणारा रस्ता हा जल्मय झाला असून नागरिकांना येण्या जाण्या करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे देखील या मुसळधार पावसाचा परिणाम उमरी तालुक्यात दिसताना पाहायला मिळत आहे तरी या पावसाचा उमरी शहरातील येथील इस्लामपुरा कॉलनीत सतत धार पावसामुळे अनेक घरे पाण्याखाली आले आहेत याकडे उमरी नगर परिषद च्या वतीने पाणी पास करण्याचं काम प्रगतीपथावर आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या