23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeनांदेडपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले

पन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले

एकमत ऑनलाईन

नांदेड : फायनान्सचे पैसे भरण्यासाठी अ‍ॅटोरिक्षाने प्रवास करणा-या एक महिलेच्या पर्समधील ५० हजार रुपये चोरुन घेतांना दोन सह प्रवाशी महिलेस रंगेहात पकडण्यात आले. सदर घटना मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास सिडको येथील कॅन्सर हॉस्पीटलसमोर घडली. या घटनेची माहिती अशी की,सिडको भागातील बचत गटाचे एका फह्यायनान्स कंपनीत पैसे भरण्यासाठी नांदेड शहरातील भावसार चौक येथील चंदा रमेश नामठानकर वय ३५ वर्ष ही महिला अ‍ॅटोरिक्षामधून मंगळवारी सकाळी ११ वाजता सिडकोकडे जात होती.त्यावेळी नांदेड ट्रेझर बाजार नवीन कौठ येथून अज्ञात दोन महिला त्या अ‍ॅटोमध्ये बसल्याक़ॅन्सर हॉस्पीटल समोर अ‍ॅटो आल्यानंतर त्या महिलांनी नंदा गायकवाड यांच्या पर्सची चैन काढून आतील ५० हजार रुपये चोरून घेत होत्या.

तेव्हा अ‍ॅटो चालक व नंदा गायकवाड यांच्या सतर्कतेमुळे हा चोरीचा प्रकार लक्षात येताच या दोन्ही महिलांना रंगेहात पकडले.यावेळी रस्त्यावर गोंधळ होत असल्याचे पाहून काही नागरीकांनी ग्रामीण पोलिस ठाण्याला घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक घोरबांड तात्काळ आपल्या सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले. पैशाची चोरी करणा-या नरसी तालुका नायगाव येथील सुजाता अशोक बोतलोन वय २५ व मदना श्रीनिवास बोतलोन वय ३० वर्ष या दोन महिलांना ताब्यात घेतले.या महिलांना ग्रामीण पोलिस ठाण्यात नेवून फिर्यादी गायकवाड यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.दरम्यान पोलिसांनी नंद गायकवाड या महिलेस सदर रक्कम परत करण्यात आली. अ‍ॅटो चालक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीस गेलेली रक्कम परत मिळाली.

गुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या