27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeनांदेडशौचालयाच्या टँकमध्ये गुदमरून दोन कामगाराचा मृत्यू

शौचालयाच्या टँकमध्ये गुदमरून दोन कामगाराचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

मुखेड/नांदेड: शौचालयाच्या सेफ्टी टँकमधील घाण बाहेर काढत असतांना दोन मजुरांचा तोल जाऊन पडल्याने गुदमरून त्यांचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. दरम्यान या मजुरांचा मृतदेह सोमवारी सकाळी ७ वाजता बाहेर काढण्यात आला. याबाबत माहिती अशी कि,शहरातील अशोकनगर भागात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम सुर्यवंशी यांच्या घराच्या शौचालयाचे टँक नादुरुस्त झाल्याने सुर्यवंशी यांनी टँक दुरुस्तीसाठी शहरातील फुलेनगर भागातील मजुरांना ठेका दिला. पाच मजुर रविवारी रात्री १० वाजता शौचालय टँकमधील घाण काढण्यासाठी त्यांच्या घरी गेले.

रात्री ११ वाजेपर्यंत सुरळीत काम सुरु होते.टँकमधील घाण काढण्यासाठी मजुर मारोती रामा चोपवाड वय ३० हा टँकमध्ये उतरुन घाण काढत असतांना टँकमधील भिंंतीवर टेकलेले पाय घसरुन टँकमध्ये पडला. तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी नागेश व्यकंटी घुमलवाड वय २५ याने आपला हात त्याला देवून वर काढण्याच्या प्रयत्न केला .त्यावेळी घुमलवाड यांचा ही तोल जाऊन तोही टँकमध्ये पडला. या दोघांना वाचवण्यासाठी घरमालक, कामावर सोबतचे तीन मजुर व शेजारी यांनी प्रयत्न केले. पण प्रयत्न निष्फळ ठरल्यामुळे बिलोली येथुन शौचालय सफाईचे टँकर बोलावून टँक साफ केला आसता टँकमध्ये पडलेले मारोती चोपवाड व नागेश घुमलवाड हे मृत अवस्थेत आढळले.

सोमवारी सकाळी ७ वाजता टँकमधुन या दोघाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, मा.सरपंच बापुराव कांबळे जुन्नेकर यानी भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली. मौलाजी रामा आडगुलवार यांच्या खबरीवरून मुखेड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष केंद्रे पुढील तपास करीत आहेत.या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या