22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeनांदेडस्वच्छ भारत अभियान चा उडाला बोजवारा

स्वच्छ भारत अभियान चा उडाला बोजवारा

एकमत ऑनलाईन

कंधार (सय्यद हबीब) : शहरातील नावाजलेल्या न.पा. च्या स्वच्छता कामाचे तीन तेरा उडाले असून शहराच्या सर्व प्रभागात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. या कडे मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी संपूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे स्वच्छ भारत अभियानाचे तीन तेरा उडाले. उठा उठा स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची घोषणा झाली. रस्त्यावरील कचरा उचलून कागद रंगवण्याची वेळ आली. या धर्तीवर कंधार नगरपालिकेचा कारभार सुरू आहे. कचरा उचलणाऱ्या कंत्राटदाराच्या कालावधी दि.३० रोजी संपल्यामुळे मागील पंधरारा दिवसांपासून शहरातील स्वच्छतेसाठी कचरा गोळा करणार्‍या काही घंटागाड्या बंद आहेत. त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असताना प्रशासनाने याकडे सपशेल दुर्लक्ष केले. कंत्राटी कामगार नसल्याने नगर परिषदेजवळ मनुष्यबळ कमी असल्याने शहरात घरोघरी तसेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे.

शहरवासियांच्या मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याने नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात आता संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील मुख्य मार्गावर खड्डेमय रस्ते त्यात मोठ्या प्रमाणावर पावसामुळे पाणी साचते, त्यामुळे स्वच्छ आणि सुंदर तर सोडा अस्वच्छतेचे माहेरघर म्हणून सध्या कंधार शहराकडे पाहिले जात आहे. एकीकडे कोरोनाच्या महामारीत स्वच्छतेला अधिक महत्व देण्याची गरज असताना नगरपालिकेच्या अंधाधूंद कारभारामुळे शहरात अस्वच्छता पसरल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. दुर्दैवी म्हणा की, सुदैव म्हणा लॉकडाऊनमध्ये लोक घरातच असल्याने उद्योग-धंदे-व्यापार बंद असल्याने त्याची अधिक तीव्रता जाणवली नाही. आता मात्र सर्व काही सुरू झाले आहे. लोकांना घराबाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे नगरपालिकेचा चेहरा आता उघडपणे खड्डेमय असल्याचा जनतेला दिसून येत आहे. महाराणा प्रताप चौक ते शिवाजी चौक या मुख्य मार्गावर अतिक्रमणात 2012 मध्ये व्यापार पेठ उद्धवस्त झाली असताना व्यापारी कसेबसे पाल टाकून व्यवसाय करतात पाऊस पडला तर खड्ड्यातील पाण्याचे शिंतोडे तर उन्हात धुळीचे कण त्यांच्या नशिबातच लिहिले की काय असे बोलल्या जाते लोकप्रतिनिधी मस्त जनता त्रस्त अशी अवस्था कंधार शहराची झाली आहे.

कंधार नगरपालिका हद्दीतील प्रत्येक वॉर्डात मोठ्या प्रमाणात डुकरांचा सुळसुळाट वाढला असून सार्वजनिक रस्त्यावर डुकरांची मलविष्टा दिसून येते,बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर रहदारी करताना पादचाऱ्यांना मोकाट जनावरांचा सामना करावा लागत आहे. त्यासोबतच सर्वत्र घाण साचल्यामुळे न.प. प्रशासनाकडून घाण उचलण्यास विलंब होत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. घनकचरा टेंडर बंद पडल्यामुळे कंत्राटी कामगार रोजंदारीवर उपस्थतीत नसल्यामुळे कामाचा बोजवारा उडाला आहे.या मुळे सामान्य जनजीवन व त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. न.पा प्रशासनाने वराह पालकांचा बंदोबस्त करून अशी मोकाट जनावरे कटघरामध्ये डांबून ठेवावे अशी मागणी जनसामान्यातून चर्चिले जाते.

स्वच्छता निरीक्षक जितेंद्र ठेवरे यांच्याशी संपर्क साधला असता स्वच्छतेबाबत कंत्राटी कामगार नसल्याने कंत्राट ची मुदत संपली असून दोन ट्रॅक्टर आणि पाच ते सहा घंटागाड्या बंद असून नगर परिषदेचे मनुष्यबळ कमी असल्याने स्वच्छतेचा वेग कमी झाला असून नवीन कंत्राट देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.

साडेचौदा लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या