24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeनांदेडउमरी शहर विकासाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. पवार

उमरी शहर विकासाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. पवार

एकमत ऑनलाईन

उमरी : उमरी शहर विकासाठी निधी कमी पडू देणार नाही पण त्याच बरोबर उमरी ग्रामिण रुग्णालया उपजिल्हा रुग्णालय चा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करेन अशी ग्वाही या मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व ७५ वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव उमरी येथिल आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.

उमरी नगरपरिषदेच्या वतीने मराठावाडा मुक्तीसंग्राम दिन व ७५ व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्सव कार्यक्रम स्व . गिरीषभाऊ मंगल कार्यालय येथे १७ सप्टेबर २०२२ रोजी आयोजीत केला होता. मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात उमरी शहर तालुक्याचे मोठे योगदान आहे या वर्षानिमित्त उमरी शहरातील स्वातंत्र्य सैनिक यांचे वारस, माजी सैनिक गुणवंत विद्यार्थ्यांचा व विशेष प्राविण्य प्राप्त खेळाडू व माजी नगराध्यक्ष यांचा भव्य यांचा सत्कार सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले . ही संकल्पना मुख्याधिकारी गणेश चाटे यांची होती.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष नायगाव मतदार संघाचे आमदार राजेश पवार हे होते.
प्रमुख पाहुणे जिल्हा प्रशासन शैलेश फडसे उमरी प्रथम वर्ग . न्यायाधिस ए.बी.रेडकर , जि प सदस्या पुनमताई पवार , माजी सभापती शिरीष देशमुख गोरठेकर , मध्यवर्ती बँक संचालक कैलासभाऊ गोरठेकर, माजी नगराध्यक्षा अनुराधा खांडरे, माजी नगराध्यक्ष प्रविण सारडा , माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी , विजयकुमार उतरवार , संजीव सवई ( गुतेदार ) , सुभाष पेरेवार , पारसमल दर्डा डॉ.एम.एम.महिंद्रकर, सविता आलसटवार, सौ.सरिता येरावार, सौ.अनिता अनंतवार, श्री.म.रफिक सज्जन, धनंजय थोरात, (मुख्याधिकारी न.प.मुखेड, ) सौ.निलम कांबळे (मुख्याधिकारी धर्माबाद, )अमोल चौधरी, न.प.बिलोली, गाढे मुख्याधिकारी मुदखेड, व्ही.एम.मठपती, उप कार्यकारी किशोर पबीतवार, साईनाथ जमदाडे, खाजा सेठ सज्जन सेठ इत्यादी प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती.

पुढे आमदार राजेश पवार म्हणाले उमरी गोरठा रेल्वेगेट अंडर ग्राउंड पुलाचे कामाला गती देण्यासाठी मंत्री यांना या सर्दभांत भेट घेवून पाठपुरावा करण्यात म्हाडा , इस्लापुर व शहरातील हुतात्मा स्मारक सुशोभीकरण करणे , उमरी ग्रामिण रुग्णालयला उप जिल्हा दर्जा मिळून प्रयत्न करेन शहरातील अशा अनेक विकास कामे असतील तर विकास निधी देण्यास मी कटिब्ध राहील . स्व . माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांची आठवण व त्यांचा आर्दश नेहमी उमरी कराच्या डोळ्यासमोर तेजीत राहण्यासाठी स्वः खर्चाने त्याचा पुतळा उभारण्यात येईल असे आमदार राजेश पवार यांनी अध्यक्षीय समारोप कार्यक्रमात बोलत होते आमदार यांनी असेच कार्यक्रम घेत चला म्हणून नगर पालिके अधिकारी कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.

मुख्याधिकारी गणेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उमरी न.प.चे कार्यालय अधिक्षक अर्जुन गव्हाणे, अभियंता संतोष मुंढे, श्रीनिवास बारोळे, लेखापाल ज्योतीराम जाधव, सत्यनारायण पिंडकुरवार, रघुनाथ जोंधळे, वरिष्ठ लिपीक सचिन गंगासागरे व गणेश शंकरराव मदने, चंद्रकांत श्रीकांबळे- मुकदम, सुर्यकांत माळवतकर,रमाबाई काठोळे सुरेश शिंदे, शंकर पाटील, शकीलखॉन पठाण, पिराजी गायकवाड, नरेंद्र खंदारे, अंकुश सवई, आकाश खंदारे, गौतम सोनफळे, शंकर माने, चंद्रप्रकाश मदने, गंगाधर पवार, हमीद बेग, माधव जाधव, शमीम बेग,पंडीत जाधव, माधव जाधव, सुरेश मुदीराज, मारोती चौदंते, राजेश्वर खांडरे, सुभाष सिंगरवाड व इतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वरीष्ठ लिपीक गणेश शंकरराव मदने यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गंगाधर पवार यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या