25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeनांदेडउमरी, माहूर तालुक्यात प्रलंबित मागण्यांसाठी न.पं.कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

उमरी, माहूर तालुक्यात प्रलंबित मागण्यांसाठी न.पं.कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

एकमत ऑनलाईन

माहूर /उमरी : राज्यातील नगरपरिषद नगरपंचायतीत कार्यरत सफाई, पाणी पुरवठ्यासह सर्व कर्मचा-यांना तसेच सेवा निवृत्त कर्मचा – यांना दोन- दोन महिने वेतन मिळत नसल्याने होत असलेल्या उपासमारीस कंटाळुन व इतर प्रलंबीत मागण्या संदर्भात शासनाचे होणारे दुर्लक्ष व डी.एन.ए. कार्यालया कडून दिल्या जाणार.्या त्रासाला वैतागून महाराष्ट्र नगर परिषद,नगर पंचायती कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेच्या सूचनेनुसार राज्य कोषाध्यक्ष तथा माहूर नगर पंचायतचे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांचे नेतृत्वात न.पं. सर्वच कर्मचा-यांनी गुरुवार दि.१५ एप्रिल रोजी दिवसीय लेखणी बंद आंदोलन केल्याने कार्यालयीन कामासाठी आलेल्या शहरवासियांना रीत्या हाताने घरी परत जावे लागले.

लेखणी बंद आंदोलन करण्यापूर्वी संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी विद्या कदम यांना दिलेल्या निवेदनातून राज्यातील नगरपरिषद , नगरपंचायती मधील कर्मचा-यांना नियमित वेतन मिळत नसल्यामुळे सफाई कामगार , पाणीपुरवठा व इतर कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ आली असल्याची व्यथा मांडण्यात आली आहे.तसेच अन्य प्रलंबित मागण्या संदर्भामध्ये दोन वषार्पूर्वी शासन स्तरावर निर्णय होऊनही आयुक्त तथा संचालक कार्यालयातून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. नगरविकास सचिव (नवि यांचेकडे संघटनेच्या पदाधिका-यांनी अनियमित वेतना बद्दल व इतर प्रलंबित मागण्या संदर्भात अनेक वेळा कैफियत मांडली, परंतु त्या विभागानेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची गंभीर बाबही निवेदनात नमूद केली आहे.

यापूर्वी संघटनेच्या वतीने १ मार्च २०२१ रोजी ढोल बजाओ, भिक मांगो आंदोलन केले होते . परंतु राज्यातील नगरपरिषद , नगरपंचायती मधील ६० हजार सफाई कामगार , पाणीपुरवठा व इतर ३० हजार सेवा निवृत्त कर्मचा – यांच्या उपासमारीकडे मुख्यमंत्री महोदयासह सर्व संबंधीतांनी दुर्लक्षच केल्याचा ठपका ठेवत नाईलाजास्तव आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचा उल्लेख त्या निवेदनात करण्यात आला आहे. २५ एप्रील पर्यंत संघटनेच्या १३ प्रलंबित मागण्या सोडविण्या संदर्भात शासन स्तरावर विचार न झाल्यास दि . ०१ मे २०२१ रोजी कामगार दिनी ध्वजारोहना नंतर अत्यावश्यक सेवेसह सर्वच कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु करतील असा इशारा संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी विद्या कदम यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. अभियंता प्रतिक नाईक,गंगाधर दळवे,देवीदास जोंधळे, देवीदास सिडाम,मंगल देशमुख, विजय शिंदे,सुरेंद्र पांडे, शे.मजहर,भाग्यश्री रासवते,शे.नयूम,गणेश जाधव,बरडे,शकिलाबी,शब्बीर भाई,अवि रुणवाल,आडे,सादीक भाई यांचेसह सर्वच कर्मचा-यांनी लेखणीबंद आंदोलनात सहभाग घेतला होता. कार्यालयीन कामासाठी आलेल्या नागरिकांना या आंदोलनाचा चांगलाच फटका बसला.

एक दिवस काम बंद आंदोलन
उमरी उमरी नगर परिषद कर्मचारी आपल्या विविध मागण्या संदर्भात गेल्या दोन वषार्पासून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करून निवेदने देऊनही सरकारला जाग येत नसल्याने सरकारला जागे करण्यासाठी उमरी नगर परिषद कर्मचारी यांच्यावतीने आज दि .१५ रोजी काम बंद आंदोलन करण्यात आले आहे .

४ महिन्यासाठी ४ कोटींचे नांदेडात कोव्हीड रुग्णालय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या