20.1 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeनांदेडट्रॅक्टर-बाईक अपघातात आजोबा-नातवाचा मृत्यू

ट्रॅक्टर-बाईक अपघातात आजोबा-नातवाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नांदेड : अवैध रेती वाहतूक करणा-या ट्रॅक्टरने बाईकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात आजोबा आणि नातू अशा दोघांना प्राण गमवावे लागले. भोकर तालुक्यातील हाळदा गावाजवळ हा अपघात झाला. ही घटना ६ जानेवारी रोजी रात्री ८: ३० वाजताच्या सुमारास घडली आहे.

रामा नरसप्पा पटपेवाड (रा. पवना तालुका हिमायतनगर) आणि हर्षवर्धन चंद्रकात दंतलवाड (रा.चिंचाळा तालुका बिलोली) असे अपघातात ठार झालेल्या वृद्ध आजोबा व नातवाचे नाव आहे. आजोबा हे बिलोलीमध्ये राहत असलेल्या मुलीकडे गेले होते. शुक्रवार दिनांक ६ रोजी ते आपल्या गावी पवनाकडे दुचाकी (क्र. एम एच २६ सीसी ९७६७) वरुन आपल्या नातवासोबत जात होते. याच दरम्यान भोकर तालुक्यातील हाळदा गावच्या नवी आबादीजवळ अवैध रेती वाहतूक करणा-या ट्रॅक्टर क्र. एम एच २६ बी क्यू ०७५० ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील आजोबा आणि नातवाचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन ट्रॅक्टर चालकास ताब्यात घेतले असून या अपघाताबाबत गुन्हा दाखल प्रक्रिया चालू होती. रेतीची रॉयल्टी व धक्के बंद असल्याने रात्री बेरात्री अवैध रेती तस्करांचे प्रमाण वाढल्याने रात्री असे अपघात होत आहेत. दोनच दिवसांपूर्वी पुरंदर तालुक्यातील पुणे-पंढरपूर मार्गावर दिवे येथे दोन मोटारसायकल्सची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला होता. गोकुळ धोंडीबा झेंडे( वय ६३) आणि पद्मनाभ झेंडे( वय ४) अशी जागेवर मृत्युमुखी पडलेल्यांची नावे होती. गोकुळ झेंडे हे बुधवारी संध्याकाळी आपल्या नातवाला त्याची शाळा सुटल्यानंतर घरी घेऊ जाताना हा अपघात घडला होता. यामध्ये गोकुळ झेंडे आणि पद्मनाभ झेंडे गंभीररित्या जखमी झाले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला होता

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या