29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeनांदेडलॉकडाऊनच्या काळात अवैध दारू विक्री बेभावात

लॉकडाऊनच्या काळात अवैध दारू विक्री बेभावात

एकमत ऑनलाईन

लोहा : लोहा तालुक्यात उत्पादन शुल्क विभागाच्या आशीवार्दाने लॉकडाऊनच्या काळात अवैध दारू विक्री बेभावात वरिष्ठांनी लक्ष देऊन विक्री तात्काळ बंद करावी व अवैध दारू विक्रीला अभय देणा-या अधिकारी व कर्मचा-यांवर ही निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

सध्या लोहा शहरासहीत संपूर्ण नांदेड जिल्ह्यात, राज्यात व देशात कोरोना या संसर्गजन्य महामारी रोगाने थैमान घातले आहे व आता कोरोनाच्या दुस-या लाटेने लोहा तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्हा व महाराष्ट्रात हाहाकार माजविला असून नांदेड राज्य शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दि. १४ एप्रिल च्या मध्यरात्री पासून ते १ मे २०२१ पर्यंत संचारबंदी लागू केली दारू दुकाने,बिअर बार ,वाईन मार्ट ,मटन हॉटेल, धाबे आदी बंद करण्याचे व दारू विक्री वर बंदी आणली आहे पण लोहा तालुक्यात उत्पादन शुल्क विभागाच्या हप्तेखोरी धोरणामुळे अवैध दारू विक्री दाम दुप्पट बेभावत होत असल्याची तक्रार जनतेतून होत आहे.

लोहा तालुक्यात लोहा शहर , सोनखेड,माळाकोळी, आष्टूर,पारडी, गंगाखेड रोड,मोंढा परीसर,बेरळी फाटा, न.पा . च्या समोरील हॉटेल, विश्रामगृहाच्या परिसरात अनेक ठिकाणी दारू माफियांनी अवैध दारूचा साठा मोठ्या प्रमाणात साठवून ठेवला असुन लॉकडाऊनमुळे अवैध दारू विक्रेत्यांची व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांची चांदी होत पण अनेक गोरगरीबांच्या संसाराची वाट लागली असुन अनेक तळीराम हे घरातील धान्य,व इतर वस्तू विकून बेभावात दारू खरेदी करून पित आहे तसेच ग्रामीण भागात मोटार सायकलवर दारूच्या पेटेच्या पेट्या पार्सल होत आहेत तेव्हा याकडे उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ही तात्काळ लक्ष देऊन लोहा तालुक्यातील अवैध दारू विक्री तात्काळ थांबवावी व या अवैध दारू विक्रीला अभय देणा-्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

तो अपहरणकर्ता जेरबंद; देगलूर पोलिसांची कारवाई चाळीस तासात अटक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या