28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeनांदेडअर्धापूर तालुक्यात अवकाळी पावसाने केली दाणादाण

अर्धापूर तालुक्यात अवकाळी पावसाने केली दाणादाण

एकमत ऑनलाईन

अर्धापूर : अधार्पूर तालुक्यात शुक्रवारी दुपारी तुफान वादळ वा-यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसाने सवार्ची दाणादाण उडवून दिली असून तालुक्यासह जिल्ह्याच्या अनेक भागात विजेच्या कडकडाटासह वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. तर काही भागात मोठी गारपीट झाली असून याचा गावासह शेत शिवारातील अनेक पिकांना मोठा फटका बसला आहे.

तालुक्यातील भोकरफाटा, बामणी, दाभड, लहान, अधार्पूर परिसरात हा पाऊस बरसला. तर भोकरफाटा, बामणी, शेलगांव आदी भागांत गारपीट झाली. यामुळे शेतातील केळी, उन्हाळी ज्वारी, भुईमूग आदी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर तुफान वादळाने शेतातील व गावातील अनेक घरांवरील पत्रे, छप्पर उडाली त्यामुळे गावकर्‍यांची एकच धांदल उडाली. गारपिटीमुळे उन्हाळी ज्वारी सह भाजीपाल्याच्या पिकांचे नुकसान झाले. तर अधार्पूर परिसरात केळीच्या बागांना गारपिटीचा फटका बसला आहे. तर वादळी वा-यामुळे केळीच्या बागा आडव्या पडल्या आहेत. या अवकाळी पावसाचा शेत शिवारासह गावनाही फटका बसला आहे.

पंचनामे करून मदत देण्याची मागणी. अवकाळी पावसा बरोबरच तुफान वेगाने वाहत असलेल्या वा-याने अनेक झाडे मोडून पडली आहेत. तर झाडांच्या फांद्या उडून वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. विद्युत तारांसह वीजपुरवठा करणा-या साहित्याचे मोठे नुकसान झाल्याने परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. या वादळी वा-याने शेत शिवारासह गावात झालेल्या नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे

परभणी हातगाडे चालकांची जागेवरच आरटीपीसीआर तपासणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या