29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeनांदेडनवर्याच्या मृत्युची बातमी कळताच, एका मुलासह पत्नीने तळ्यात उडी मारून केली आत्महत्या

नवर्याच्या मृत्युची बातमी कळताच, एका मुलासह पत्नीने तळ्यात उडी मारून केली आत्महत्या

एकमत ऑनलाईन

लोहा : महाराष्ट्रात नव्हे तर सबंध देशात कोरोना महामारी थैमान घातले. यातच लोहा शहरातील बालाजी मंदिरच्या पाठीमागे आंध्र प्रदेशातून आलेल एक कुटुंब रोज मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. कोरोना महामारीने या कुटुंबात शिरकाव केला. पती हनुमंत शंकर गदम हे पॉझिटीव्ह आल्यानंतर लोहा येथील कोविड सेंटर येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला ही बातमी पतींना कळताच तीन वर्षाच्या मुलासह महिलेने सुनेगाव येथील तलावात उडी मारून आत्महत्या केली.

शहरातील बालाजी मंदिरच्या पाठीमागे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी पहाटे घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.पद्मा हनुमंत गदम (वय३५) लल्ली (वय०३) अशी मृत मायलेकराचे नावे आहेत. या घटनेमुळे परिसर हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्माने नव-्याच्या निधनानंतर तीन मुलांना घेऊन संसाराचा गाडा चालणार कसा याचिंतेने आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. फियार्दी चिन्नना दुर्गना गदम (३९) रा. संतोष नगर निजामबाद यांनी दिलेल्या फियार्दीवरून लोहा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक भागवत जायभाय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक का-हे हे पुढील तपास करीत आहेत

नुकसानग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या