लोहा : लोहा तालुक्यासहीत नांदेड जिल्ह्यात रेती घाटाचे टेंडर सुटले नसल्यामुळे वाळू माफिया व महसूल व पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मिलीभगत मुळे गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या चोरून रेतीचा उपसा होत असून अवैध वाळू उपसा व अवैध रेती वाहतूक करणारे मोठे रॅकेट असुन यात वाळू माफियानी गोदावरी नदीपात्रात शेकडो बिहारी मजूर लावून गोदावरी नदी पात्रात पाणी असुन सुद्धा बिहारी मजूर असंख्य तराफे व टोक-्या च्या सहायाने लोहा तालुक्यातील बेटसांगवी कट्याळया ,शेवडी,पेनूर, चित्रावाडी, भारसावडा , अंतेश्वर, येथून हजारो ब्रास चोरून रेती उपसा करून जवळपास ५० ते ६० टॅक्टरद्वारे काढलेली रेती वाहतूक करून अनेक ठिकाणी साठवून करून जेसीबी द्वारे अनेक हायवा व टिप्पर द्वारे वाहातूक रात्र न दिवस करीत आहेत.
लोहा तहसिलदारांने दि.१४ फेब्रुवारी रोजी सुटीच्या दिवशी ही सकाळी- सकाळी येळी येथील गोदावरी नदीपात्रातील वाळू घाटावर जाऊन धाडसी कारवाई करून अनेक तराफे नष्ट केले हे उल्लेखनीय कार्य केले आहे त्यामुळे त्यांचे जनतेमधून कौतूक ही होत आहे पण तहसिलदार लोहा तालुक्याच्या मुख्यालयी राहत नाहीत. त्यांनी एकीकडे येळी घाटातील अवैध रेती उपसा करणा-्या तराफे याच्यावर धाडसी कारवाई केली आहे पण दुसरीकडे बेटसांगवी कटाळया, शेवडी,पेनूर, चित्रावाडी, भारसावडा, अंतेश्वर या ठिकाणी सुट दिली अशी चर्चा जनतेतून होत आहे. बेटसांगवी,शेवडी,पेनूर, चित्रावाडी, भारसावडा,अंतेश्वर सांयकाळी ५ ते सकाळी ११ या वेळेत अवैधरित्या चोरून रेती उपसा करण्यासाठी जणू काही जत्राच भरत आहे व त्यात तर शनिवारी, रविवारी शासकीय सुट्टी असल्यामुळे तर वाळू माफियांची तर चांदीच होत असून शनिवारी, रविवारी तर दिवसभर रेती उपसा व वाहतूक चालू आहे.
याकडे मात्र तलाठ्यापासून ते उपविभागीय अधिका-्यां पर्यंत व पोलीस कॉन्स्टेबल पासून ते डीवायएसपी पर्यंत कुणाचेही लक्ष नाही. सगळ्याला वाळू माफियांने मॅनेज केल्याची चर्चा जनतेतून होत आहे. त्यामुळे त्यांनी वाळू माफियांना रान मोकळे सोडून दिले आहे अशी चर्चा जनतेतून होत आहे. तहसीलदारांनी येळीला कारवाई केली तर इकडे अंतेश्वर, भारसावडा,चित्रावाडी,पेनूर, शेवडी,बेटसांगवी इकडे का दुर्लक्ष केले आहे तिकडे कारवाई का कारवाई करीत नाहीत असा सवाल जनतेतून होत आहे. तहसिलदारांने एकीकडे वाळू कारवाई केली तर दुसरीकडे सुट दिली आहे का अशी चर्चा जनतेतून होत आहे. तेव्हा लोहा तालुक्यात गोदावरी नदी पात्रातून होत असलेल्या अवैध रेती उपसा व वाहातुकीकडे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक या वरिष्ठांनी तात्काळ लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
जणगणनेतील ओबीसींची आकडेवारी प्रसिद्ध करा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश