21.8 C
Latur
Wednesday, October 21, 2020
Home नांदेड खा.चिखलीकरांमुळे मिळालेल्या आमदारकीचा लोककल्याणासाठी वापर करा

खा.चिखलीकरांमुळे मिळालेल्या आमदारकीचा लोककल्याणासाठी वापर करा

एकमत ऑनलाईन

कंधार : ज्यांना राजकारण आणि निवडणूका म्हणजे काय हे माहित नव्हते त्यांना खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुण्याईने थेट विधानसभेपर्यंत पोहचता आले त्या आ.श्यामसुंदर शिंदे यांनी बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुण्याईने मिळालेल्या आमदारकीचा वापर लोककल्याणासाठी करावा, असा खोचक सल्ला भाजपा कंधार तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांनी दिला आहे.

कंधार – लोहा विधानसभा मतदारसंघातून खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुण्याईने व त्यांच्या लक्ष्मी पुण्याईने निवडून आलेले आ.श्यामसुंदर शिंदे यांनी काल कंधार येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत तत्कालीन आमदार तथा विद्यमान खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर आणि कार्यकर्तृत्वावर अनेक आरोप केले. लोहा येथील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीचा निधी आमदारांमुळे परत गेला असा आरोप चिखलीकर समर्थक करत असल्याची ओरड केली. शिवाय चिखलीकर आमदार असतांना मतदारसंघात काय दिवे लावले अशी पातळी सोडणारी टिकाही केली.

वास्तविक लोह्याचे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुतळा उभारणीचा निधी परत गेल्याचा उल्लेख केला मात्र तो आमदारांमुळे गेला असे ते म्हणाले नव्हते. खा.चिखलीकर यांनी मंजूर केलेले तिघाडी सरकारने मंजूर केले नाही. त्यामुळे निधी परत गेला असे म्हणाले होते. त्यामुळे आ.शिंदे यांनी इतकी आगपाखड करुन घेणे कशासाठी? एवढेच नाही तर कंधार-लोहा तालुक्यात ज्या आरोग्य केंद्रांना लवकरच मंजूरी मिळणार असल्याची माहिती खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी माध्यमांना दिली होती. त्या माहितीचा आ.श्यामसुंदर शिंदे यांनी न वाचताच विपर्यास केला.

माध्यमात छापून आलेल्या प्रत्येक बातमीत लोहा -कंधार तालुक्यात आरोग्य केंद्रांना लवकरच मंजूरी मिळणार असा उल्लेख आहे. परंतु पी हळद अन हो गोरी या उक्तीप्रमाणे सहज आमदारकी मिळालेले शिंदे भलतेच हुरळून गेले आहेत, असा टोलाही तालुकाध्यक्ष राठोड यांनी लगावला आहे. सन २००७ च्या आरोग्य विभागाच्या बृहत आराखड्यात पानशेवडी येथील आरोग्य केंद्राला मंजूरी मिळाली होती परंतु जागेचा वाद उदभवल्याने निविदा प्रक्रिया पुर्ण झाली नव्हती त्यामुळे निधी परत गेला होता. ही बाब आ.श्यामसुंदर शिंदे यांनी निटपणे समजून घेणे आवश्यक होते. ज्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध वृत्तपत्रांची कात्रणे दाखविली आणि आपण खुप मोठा गौप्यफोट केल्याचा आव निर्माण केला.

त्याऐवजी आ.श्यामसुंदर शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने ज्या शेतक-यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीन पाण्यात गेले, ज्वारीच्या कनसावर मोड फुटले ते सोयाबीन आणि मोड फुटलेले कणीस विधानसभेत नेऊन दाखविले असते, शेतक-यांसाठी आवाज उठविला असता. नुकसान भरपाई मिळवून दिली असती तर शिंदे लोकप्रतिनिधी दिसले असते. दुदैर्वाने आ.शिंदे यांना अद्यापही लोकहिताचा कळवळा नसल्याचे दिसून आल्याचेही भगवान राठोड म्हणाले.

तत्कालिन आमदार तथा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघात लिंबोटी धरण उभारले याची माहिती आमदारांना नाही का? मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सर्वोत्तम शिक्षणासाठी डॉ.बाबासाहेब आंबडेकर शासकीय मुलांचे वसतीगृह मंजूरीसाठी कोणी प्रयत्न केले. शासकीय ४ गोदाम कोणाच्या काळात मंजूर झाली. कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या ३० खाटांची क्षमता ५० खाटापर्यंत कुणामुळे पोहचली, याचा अभ्यास आ.श्यामसुंदर शिंदे यांनी आधी करावा. ज्यांच्यामुळे राजकारणाचा र आपणास कळाला.

आपण आमदार झालात त्यांच्यावर बिनबुडाचे आणि अल्पज्ञानी आरोप करणे सोडून द्यावे, लोकहितासाठी, लोकहिताच्या प्रश्नांचा अभ्यास करावा. जनतेला कोण खोटे बोलत आहे. हे कंधार – लोह्यातील जनतेला चांगलेच माहिती आहे, हे आपण सांगण्याची गरज नाही, असा उपरोधिक सल्लाही भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांनी दिला आहे.

मुंगसाच्या दोनपैकी एका पिलाचे वाचवले प्राण – पक्षीमित्र महेबुबचाचांची धडपड

ताज्या बातम्या

दोन आणि तीन पदरी मास्क ३ ते ४ रुपयांना मिळणार : राजेश टोपे

मुंबई : कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावे यासाठी पुढाकार घेणारे राज्य म्हणून...

मराठी भाषेचा ऍमेझॉन ऍपमध्ये समावेश

मुंबई : ऑनलाइन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेले ऍमेझॉन ऍप आता मनसेच्या इशा-यापुढे नमले आहे. कारण ऍमेझॉन ऍपमध्ये मराठी भाषेचा समावेश केला जाणार आहे. ऍमेझॉन ही...

शेतक-यांच्या दु:खाचे होऊ नये हसू!

हे वर्ष जगाच्या इतिहासात मानवाचे सत्व पाहणारे वर्ष म्हणूनच नोंदविले जाईल, यावर आता राज्यापुरते तरी शिक्कामोर्तबच झाले आहे. अगोदर कोरोनाने सगळा देश ठप्प करून...

नियोजनाचा ‘अंधार’

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये काही तासांसाठी वीजपुरवठा खंडित झाला आणि पाहता पाहता देशभरात त्याची चर्चा सुरू झाली. या ‘बत्ती गुल’चा फटका लोकल सेवा, मुंबई...

क्वाड आणि आत्मनिर्भर भारत

टोकिओमध्ये काही दिवसांपूर्वी अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या चतुष्कोनी समूहाची (क्वाड) बैठक झाली. परराष्ट्रमंत्री स्तरावरील ही दुसरी बैठक होती. या बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री...

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी साधला थेट शेतकऱ्यांशी संवाद

औरंगाबाद, दिनांक 20 : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी पैठण तालुक्यातील मुरमा आणि औरंगाबाद तालुक्यातील पिंपळगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट शेतकर्‍यांशी...

प्रथमच देशात करण्यात आली हिंगाची लागवड

नवी दिल्ली : भारतातील जवळजवळ सर्वच घरांमध्ये आवर्जून आढळणा-या मसाल्याच्या पदार्थांपैकी एक म्हणजे हिंग. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग...

राहुल गांधींनी त्या बहिणींना दिला न्याय

वायनाड : काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी आपल्या मतदारसंघाच्या दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी सर्वस्व गमावलेल्या दोन बहिणींना घराच्या चाव्या सुपूर्त केल्या. या...

भारताविरुध्द इसिस चा कट उघडकीस

नवी दिल्ली : भारताविरूद्ध सुरू असलेला आयएसआयएस आतंकवादी संघटनेचा मोठा प्लॅन उघडकीस आला असून, आयएसआयएस आतंकवादी संघटनेचे एक द्वेषपूर्ण डिजिटल मासिक हाती लागले आहे. भारताविरूद्ध...

केंद्राकडे बोट दाखविणे म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा

उस्मानाबाद : राज्य सरकारमध्ये तीन पक्ष असल्याने प्रचंड मतभेद आहेत. परंतू कांही ही झाले तरी केंद्र सरकारकडे बोट दाखविले जाते. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीसह सर्वकांही...

आणखीन बातम्या

हदगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी – युवक कॉग्रेसची मागणी

हदगाव : गेल्या काही दिवसांपासून सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हदगाव तालुकाओला दुष्काळ जाहीर करून...

विकास निधीसाठी कोणाकडे जाण्याची गरज नाही

लोहा : शहराच्या विकास कामांच्या निधीसाठी कोणाच्याही दारात जाण्याची गरज नाही. प्रतापराव पाटील चिखलीकर सक्षम आहे,असा टोला आ.शिंदे यांना नाव न घेता लगावला.तर नगरपालिका...

कोरोनाबाधितांचे पुन्हा शतक पार; पाच जणांचा मृत्यू

नांदेड : कोरोना अहवालानुसार सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात २१२ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. १०१ व्यक्तींचे अहवाल बाधित आल्याने...

परीक्षांचा गोंधळ ; विद्यापीठासमोर निदर्शने

नांदेड : करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातंर्गत अंतिम वर्षाच्या परीक्षा चालू आहेत. या आनॅलाईन,ऑफलाईन परिक्षेचा गोंधळ उडत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक...

नगरपरीषदेच्या बनावट कागदपत्रांच्या प्रकरणातील आरोपी अटक

धर्माबाद (प्रतिनिधी) येथील नगरपरीषदेतील काही कर्मचारी व शहरातील काही दलालांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारावर दस्तनोंदणी करून करोडो रुपयांचे चांगभले करून घेतले होते.सदरील प्ररकरणातील...

हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ आर्थिक मदत जाहीर करा

हिमायतनगर : तालुक्यातील शेतकऱ्यांना covid-19 च्या काळात लोक डॉन पडल्यामुळे खरीप हंगामात अवाच्या सवा भावाने खत व बी बियाणे खरेदी करावी लागली यातच सोयाबीनच्या...

मौजे बाभूळगाव येथे जागतिक हात धुवा कार्यक्रम

धर्माबाद( प्रतिनिधी) : मौजे बाभूळगाव ता.धर्माबाद जि.नांदेड येथे जागतिक हात धुवा कार्यक्रम आयोजित करण्यात आला स्वच्छ भारत मिशन (ग्रामिन)अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छतेच्या विविध कार्यक्रमावयक्तिक...

कर्ज काढू पण शेतक-यांना मदत करू : ना.वडेट्टीवार

नांदेड : अतिवृष्टीमुळे शेती व शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे पंचनामे युद्धपातळीवर लवकरात लवकर पूर्ण करून तसा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश...

‘एकमत’ च्या आरती संग्रह पुस्तिकेचा उपक्रम कौतूकास्पद

नांदेड : कोणतेही अभियान अथवा उपक्रम असो त्यात सातत्य असेल तर त्याचे महत्व वाढते. दै.निक एकमतच्यावतीने गेल्या ११ वर्षापासुन नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने धार्मिक महत्व...

घोगरी येथील जयश्री व राजश्री खडतर प्रवासात साईप्रसाद परीवाराच्या नाथांची मदतीला दानशूर व्यक्तींची साथ

हदगाव :- तामसा ते भोकर रोडवर घोगरी ता.हदगाव छोटेसे गाव आहे. येथील दिलीप जाधव यांची भाची कु.जयश्री पाच महिने तर कु.राजश्री दोन वर्षांची असताना...
1,308FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...