24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात विविध पुरस्कारांचा सुळसुळाट

नांदेड जिल्ह्यात विविध पुरस्कारांचा सुळसुळाट

एकमत ऑनलाईन

नांदेड (निलकंठ वरळे) : महाराष्ट्राचा पुर्व इतिहास सांगतो की, कोणाच्या एखाद्याची उत्तम कामगिरी पाहून त्याला गौरविण्यात येवून त्याच्या भविष्यातील कामाला प्रोत्साहन मिळावे यासाठी काही निवडक व्यक्तींना पुरस्कार दिले जायचे. त्यामुळे त्यांच्या पुरस्काचा मान सन्मानही जिल्ह्यात होत असे. कलयुगात मात्र नवीन प्रथा पडली आहे. सेवाभावी संस्था काढायची आणि त्याच्या नावाखाली दुकानदारी थाटण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. यातूनच दिल्या जाणा-या पुरस्काराचा सुळसुळाट झाला आहे.

नांदेड जिल्हा संत महात्म्यांची भूमि म्हणून ओळखल्या जाते. या शहराचे नाव फारपुर्वी नंदीग्राम असे होते. या शहराची ओळख जगभर संत गुरुगोविंदसिंघजी महाराज यांच्या नावाने झाली आहे. आजही जगाच्या नकाशावर सचखंड हुजूर साहिब म्हणूनच नांदेडची ओळख आहे. त्यामुळे या शहरातील विविध कार्यक्रम जगात गाजले आहेत. या शहराला अनेक संत महात्म्यांचे चरण लागले आहे.

जगभर प्रसिध्द असलेल्या नांदेड शहराला या कलयुगात मात्र गालबोट लागले असल्याचे अनेक विश्लेषक सांगत आहेत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे नांदेड शहरात अनेक सहकारी संस्था व सेवाभावी संस्था निर्माण झाल्या आहेत. आपल्या मर्जीतील व्यक्ती अथवा संस्थेचे चांगभले करणा-या व्यक्तींनाच हा पुरस्कार जाहिर केला जातो. अनेकांनी तर पैसे द्या, पुरस्कार घ्या.. अशी दुकानदारी थाटली आहे. या पुरस्काराच्या नावाखाली स्वत: ची प्रसिध्दी, जाहिरातबाजी करण्याचा चंग सहकारी संस्था व सेवाभावी संस्थेने लावला आहे. यामुळे अनेक नामवंत व्यक्ती आजही पुरस्कारापासून दूर आहेत. पुरस्कार मिळाला म्हणजे कशासाठी मिळाला हे सांगणे देखील पुरस्कारप्राप्त व्यक्तींना सांगता येत नाही. त्यांची कारकिर्द पाहून आपणास पुरस्कार मिळाला का असे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

शहरातील नामवंत व्यक्तींना देखील आता याचा मोह अवरता येत नसल्याचे पहावयास मिळत आहे. पुरस्काराच्या नावाखाली दुकानदारी करुन आपली रोजीरोटी चालविण्याचा प्रकार शहरात आता होत आहे. त्यामुळे पुरस्कार कुठल्या संस्थेचा आहे, या संस्थेचा लेखाजोखा काय आहे, पुर्व इतिहास काय आहे. संबंधीत संस्थाचालकाचा भूतकाळ काय होता हे देखील पुरस्कारप्राप्त व्यक्तीने पहावयास हवे. केवळ पुरस्कार मिळतो म्हणून भूतकाळ खराब असलेल्या व्यक्तींकडून पुरस्कार स्वीकारणे म्हणजे लज्जास्पद बाब म्हणून ओळखल्या जाते. यावर अंकुश ठेवायचा असेल तर सर्वानीच पुरस्कार घेण्यापुर्वी त्या संस्थेचा इतिहास पाहणे आवश्यक असल्याचे नांदेडकरातून बोलल्या जात आहे.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या