देगलूर : देगलूर तालुक्यातील करडखेड येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने वटपौर्णिमेच्या निमित्त महादेव मंदिर येथे देगलूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
त्याप्रसंगी देगलूर उपजिल्हा रुग्णालयचे तालुका आरोग्य अधिकारी आकाश देशमुख, देगलूर पंचायत समितीचे विस्ताराधिकारी दयानंद सूर्यवंशी,कृषी अधिकारी एस. एस ईडोळे, देगलूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संगमेश्वर कानडे ,पत्रकार मिलिंद सोनकांबळे कावळगावकर, करडखेड ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी गणपत शिळवणे, ग्रामपंचायत सदस्य अशोक कोकणे, अशोक आबाजी, बालाजी इबितवार, अंकुश सूर्यवंशी, अरविंद गड्डपवार, सतीश दोमल वार, अहमद चौधरी,फैयाज शेख व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.