26.3 C
Latur
Sunday, March 26, 2023
Homeनांदेडविक्की ठाकूर खून प्रकरणात आठ जणांविरुध्द गुन्हा

विक्की ठाकूर खून प्रकरणात आठ जणांविरुध्द गुन्हा

एकमत ऑनलाईन

नांदेड : गाडीपुरा भागात गोळया घालून विक्की ठाकूरचा मंगळवारी रात्री खून करण्यात आला होता.या प्रकरणात दोन महिलांसह आठ मारेक-यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.एका आरोपीने तुरूंगातून या खूनाचा सर्व कट रचला असे एफआयआरवरून दिसत आहे. या मारेक-यांना शोधण्यासाठी पोलीसांचे तीन पथक विविध भागात रवाना झाले आहेत.

शहरातील गाडीपुरा भागात काल मंगळवार दि.२० जुलै रोजी सायंकाळी साडे सात ते आठच्या सुमारास विक्की दशरथसिंह ठाकूर वय ३२ याचा दोन दुचाकीवर आलेल्या पाच मारेक-यांनी गाडीपुरा भागातील ममता पान ते गजेंद्र ठाकूर यांच्या घराच्या दरम्यान गोळ्या झाडून खून केला. तो खाली पडल्यावर त्याच्या शरिरावर तलवारीने अनेक वार करून मारेकरी फरार झाले तर विक्की ठाकूरसोबत असलेला सुरज भगवान खिराडे २९ रा.असर्जन हा युवक आपल्या मित्रावर झालेला हल्ला पाहुन तो गल्लीबोळाने पळाला पळता अनेक जागी पडला आणि जखमी झाला. त्यानेच या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाणे इतवारा येथे दिली आहे. या तक्रारीत, दोन महिला आणि कैलास बिघानीया वगळता इतर पाच जण दोन दुचाकीवर आले होते.त्यांनी दोन बंदुकातून विक्की ठाकूरवर हल्ला केला . विक्की चव्हाण खून प्रकरणाच्या गुन्ह्यात साक्ष देवू नये म्हणून विक्की ठाकूरचा खून करण्यात आला असे लिहिले आहे.

या तक्रारीनुसार इतवारा पोलीसांनी गुन्हा क्रमांक १७६/२०२१ भारतीय दंड संहितेच्या कलम १४३, १४७, १४८, १४९, ३०२, ३०७, १२०(ब), २९४ आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४,३/२५ आणि २७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास इतवाराचे पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांच्याकडे दिला आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष घटना पाहणा-या व सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे मारेकरी पाहिले तर त्यांनी एका विशिष्ट समाजाची ओळख असलेली टोपी प्रत्येकाने धारण केली होती. यावरून विक्की ठाकूरचा खून करून पेहरावाच्या आधारावर दोन समाजात वितुष्ट तयार होईल अशी कृती सुध्दा मारेक-यांनी केली होती. पण सुरज खिराडेने हा डाव उधळून लावला. त्यामुळे समाजाची शांताता कायम आहे.

तक्रारीत लिहिल्याप्रमाणे नितीन जगदीश बिघानीया, दिगंबर काकडे, मुंजाजी उर्फ गब्या धोंगडे, लक्की मोरे पाटील, गंगाधर अशोक भोकरे, कैलास जगदीश बिघानीया, अंजली नितीन बिघानीया, नितीन बिघानीयाची बहिण ज्योती बिघानीया अशा आठ जणांची नावे आहेत. या आठ जणांपैकी कैलास जगदीश बिघानीया हा सध्या विक्की चव्हाण खून प्रकरणात तुरूंगात आहे. प्राप्त माहितीनुसार टेलीफोनवरील बोलणे, त्याचे रेकॉर्डींग या आधारावर विक्की ठाकूरचा खून करण्यात महिलांचापण कटात सहभाग आहे असे दिसते. कैलास बिघानीयाने तुरूंगात राहुन या खूनाचा कट रचला .ऑगस्ट २०२० मध्ये विक्की ठाकूरचा मित्र विक्की चव्हाणचा खून करण्यात आला होता. विक्की चव्हाण मरण पावल्यानंतर त्याचे प्रेत मारेक-यांनी गावभर फिरवले होते आणि जागोजागी त्याच्यावर तलवारीने वार केले होते अशी त्या खूनाची पार्श्वभुमी आहे. कैलास बिघानीयासह जवळपास १२ ते १४ जण विक्की चव्हाणच्या खून प्रकरणात सध्या तुरूंगात आहेत. दोन गँगमध्ये सुरू झालेल्या खुनाच्या युद्धाला पोलिसांनी लगाम लावला अशी मागणी होत आहे.

कोरोनाविरुद्धची लढाई एक जुटीने लढायला हवी

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या