23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeनांदेडरुई येथील ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

रुई येथील ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

एकमत ऑनलाईन

हदगाव : मानवाडी ते निवघाबाजार या मार्गावर असलेल्या मौजे रुई ता.हदगांव येथील गावातील विद्युत प्रश्न एस.टी.बस प्रश्न, वानरांचा त्रास या प्रमुख मागण्या सोडण्यासाठी रुई येथील संरपंच अमोल पाटील रुईकर उपसरपंच भिमराव वाढवे यांनी ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांच्या वतीने विद्युत वितरण कंपनी, आगार व्यवस्थापक, वनपरिक्षेत्र कार्यालयासह तहसीलदार जिवराज डापकर यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली असुन अडचणी दूर न झाल्यास तिस रोजी हदगाव तहसील कार्यालयासमोर नाईलाजाने आमरण उपोषणाला बसणार असल्याचा लेखी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.

रुई येथील विद्युत वितरण कंपनीच्या जुन्या पद्धतीच्या तारा निकामी झाल्याने व विद्युत पोल सह विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. विद्युत वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे गावात अप्रीय घटना घडली होती.दुसरी घटना घडु नये यासाठी संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

तर गावातील शालेय विद्यार्थ्यांना व प्रवास्यांना हदगाव कडे ये जा करण्यासाठी एस.टी.बस नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. संबंधित विभागाने लक्ष देऊन रुई येथील प्रवास्यांसह शालेय विद्यार्थ्यांसाठी सोयीसाठी संबंधित विभागाने रुई येथे एस टी बस सुरू करण्याची मागणी केली आहे.

गावात वानरांने धुमाकूळ घातला असून गावकरी वानरांचा त्रासाला कंटाळले असल्याने संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. संबंधित सर्व विभागाला रुई येथील संरपंच अमोल पाटील रुईकर उपसरपंच भिमराव वाढवे यांनी ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांच्या वतीने बावीस ऑगस्ट रोजी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली असुन अन्यथा तिस आगस्ट रोजी हदगाव तहसील कार्यालयासमोर नाईलाजाने आमरण उपोषणाला बसणार असल्याचे कळविले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या