21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडवन्यप्राण्यांच्या उद्रेकाने गावकरी त्रस्त

वन्यप्राण्यांच्या उद्रेकाने गावकरी त्रस्त

एकमत ऑनलाईन

शिराढोण : वन्यप्राण्यांना वाढण्यासाठी व लपण्यासाठी पोषक स्थिती असल्याने त्यांची पैदासही वाढू लागली आहे. यात ससे, रानडुक्कर, मोर, भेकर यांची संख्या भरपुर वाढली आहे. या सर्व प्राण्यांमुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. कंधार तालुक्यातील शिराढोण येथील जांबदरा भागात डोंगराच्या पायथ्याशी वावरणा-या रानडुकरांनी आता धुमाकूळ घालत उसाची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली आहे. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे. या डुकरांच्या त्रासामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, नुकसानभरपाईच्या मागणीबरोबरच डुकरांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे.

भागात पाणी पातळी वाढल्यामुळे बागायत पिके घेणा-या शेतक-यांचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने ऊस पिकांचा समावेश आहे. या सर्वांमध्ये ऊस मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. येथील शेतक-यांनी यासाठी पाण्याच्या व्यवस्था देखील केल्या आहेत. अगदी चार ते पाच किलोमीटर पाइपलाइन करून पाणी शेतात नेले आहे. त्यासाठी लाखो रुपयांची कर्जे काढली आहेत. बारमाही पाण्यामुळे येथील शेतक-यांना बागायती पिके घेउन आपली प्रगती साधण्याची संधी मिळाली. मात्र, वन्यप्राणी शेतीच्या मुळावर उठल्यामुळे या शेतक-यांसमोर संकट उभे ठाकले आहे. विभागातील अनेक गावांत डुकरांनी उपद्रव माजविला आहे.

डोंगरातील झाडेझुडपे वाढल्यामुळे तसेच डोंगरपायथ्यापर्यंत उसाचे पीक पसरल्याने जंगलसदृश स्थिती आहे. वन्यप्राण्यांना वाढण्यासाठी व लपण्यासाठी पोषक स्थिती असल्याने त्यांची पैदासही वाढू लागली आहे. यात ससे, रानडुक्कर, मोर, भेकर यांची संख्या भरपुर वाढली आहे. या सर्व प्राण्यांमुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. सध्याही येथे रानडुकरांचा मोठा त्रास होत आहे. रात्रीच्या वेळी रानडुकरांच्या झुंडीच्या झुंडी शेतात फिरून नासधूस करत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. विशेषत: डोंगरपायथ्यालगतच्या शेतीला नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

टेंभुर्णी बस स्टँडसमोर जनशक्ती संघटनेचे झाडे लावून आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या