29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeनांदेडनियमांचे उल्लंघन; सगरोळीच्या आठवडी बाजारात उडाला फज्जा

नियमांचे उल्लंघन; सगरोळीच्या आठवडी बाजारात उडाला फज्जा

एकमत ऑनलाईन

सगरोळी : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने १४ एप्रिलच्या ८ वाजल्यापासून १ मे च्या सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात कडक संचारबंदी लागू असून कोरोना संक्रमणाला ब्रेक लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजारांवर बंदी घातली आहे; माञ सगरोळी गावात मुख्य ज्युबली मार्केटमध्ये दि २१ एप्रिल रोजी बुधवारी भरलेल्या आठवडी बाजारात ग्राहकांनी भाजीपाला व इतर गृहोपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

ग्राहकांमध्ये मास्क व फिजिकल उपाययोजनांचा मोठा अभाव दिसून आल्याने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा ज्युबली मार्केटमध्ये फज्जा उडाला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने काही काळ आठवडी बाजारावर बंदी घातली असताना बिलोली तालुक्यातील मौजे सगरोळी येथिल आठवडी बाजार दि २१ एप्रिल वार बुधवार रोजी भरगच्च भरला होता. बहुतांश ग्राहक विना मास्क फिरत होते. कोरोना वायरसच्या प्रादुभार्वाने हाहाकार माजवला असून दहा हजार लोकसंख्येच्या गावात तब्बल ४३ च्या वर कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामुळे गावात खळबळ उडाली असून गावक-यांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी फिजिकल डिस्टस्निगचा थांगपत्ता नव्हता. सगरोळीत पाच दिवसाचा जनता कर्फ्यु करावा. सगरोळी हा गाव रेड झोन मध्ये ठेवून १३-स्रू चाचणी करून एकीकडून लोकांचे टेस्ट करण्यात यावे. अशी मागणी गावकरी वगार्तून होत आहे.

बाजारात आलेल्या व्यक्तीपैकी कोण पॉझिटीव्ह कोण निगेटीव्ह हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे बाजारातील गर्दी व नागरिकांचा हलगर्जीपणा कोरोनाच्या संक्रमणास कारणीभूत ठरु शकतो. अशी शक्यताही वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्तीनी व्यक्त केली. शासनाने लॉकडाऊन घोषित केले असले तरी दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी जाहीर केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसाय बंद ठेवण्याच्या सुचना केल्याने व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने सकाळी बंद ठेवली होती. दुपारी बाहेरून आलेल्या व्यावसायिकांनी व व्यापा-्याने अचानक बाजारपेठ भरगच्च भरल्याने बुधवारी बाजारपेठेत मोठ्या प्रमणात गर्दी केली होती. कोवीडचे वाढते रुग्ण पाहाता सगरोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात किट नसल्यामुळे कोव्हीड तपासणी करण्यासाठी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे यामुळे अँन्टीजन किट व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर कर्मचार्‍यांसाठी हॅडग्लोज, मास्क, सँनिटायझर, कोव्हीड कीट उपलब्ध करुन देण्याची मागणी परिवर्तन पँनलचे ग्रा.प. सदस्य शंकर महाजन यांनी केली आहे.

आम्ही पाया पडायलाही तयार; राज्य सरकार कोरोनापुढे हतबल?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या