20.8 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeनांदेडविष्णुपुरी धरण ८४ टक्के भरले; दरवाजे उघडण्याची शक्यता

विष्णुपुरी धरण ८४ टक्के भरले; दरवाजे उघडण्याची शक्यता

एकमत ऑनलाईन

नांदेड : पहिल्यात मृग नक्षत्रात नांदेड जिल्हयात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.तर शंकरराव चव्हाण विष्णुपुरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत असून गुरूवारी धरणातील पाणी साठा तब्बल ८४ टक्के झाला आहे. पाण्याची आवक अशीच सुरू राहिली तर धरणाचे दरवाजे कोणत्याची क्षणी उघडण्याची तयारी पाटबंधारे विभागाने केली आहे.

तीन वर्षापुर्वीपर्यंत पाणी टंचाईचा सामना करणा-या नांदेड जिल्हयात मागील दोन वर्षापासून पावसाने मोठा दिलासा दिला आहे.जिल्हयात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे नदी,नाले व शहराला पाणी पुरवठा करणारे शंकरराव चव्हाण विष्णुपुरी धरण तुडूंब भरले होते.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे तर धरणाचे दरवाज अनेक वेळा उघडून खालच्या भागात पाणी सोडावे लागले होते.यंदाही पावसाची मेहरबानी राहणार आहे.पहिल्याच मृग नक्षत्रात गेले दोन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.त्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुर्णा,परभणी व अन्य भागात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

यामुळे गुरूवारी विष्णुपूरी धरणातील पाणी साठा तब्बल ८४ टक्के झाला आहे. पुढेही पाण्याची आवक अशीच सुरू राहिली तर कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडण्याची तयारी पाटबंधारे विभागाने केली आहे.यामुळे धरणाच्या खालच्या बाजूस असणा-या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य, इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सूचना देण्यात याव्यात असे पूर विष्णुपुरी धरण नियंत्रण कक्ष अधिका-यांकडून तहसीदार यांना सांगण्यात आले आहे.

मागील चार वर्षापुर्वी नांदेड जिल्हयात कमी पावसामुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागला.यामुळे महानगरपालिकेकडून शहरवासियांना चार दिवसा आड पाणी पुरवठा करावा लागला होता.मात्र गेल्या वर्षापासून पाणीची चिंता विष्णुपुरी धरणातील मुबलक पाणी साठयामुळे मिटली आहे.यंदाही चांगला पाऊस होईल असे भाकित हवामान खात्याने वर्तविले आहे.यानूसार पहिल्याच मृग नक्षत्रात पावाची दमदार एंन्ट्री झाली आहे.यामुळे आगामी काळातील नांदेडची पाणी चिंता दुर होणार आहे.

आषाढीवारी यंदाही प्रतिकात्मकच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या