कुंडलवाडी:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अर्जापुर ता. बिलोली या शाळेस डॉ.दतात्रय मठपती शिक्षण उपसंचालक लातूर, तसेच उपसंचालक कार्यलयातील अधिकारी देशपांडे यांनी अचानक भेटी दिली असता शाळेचे शैक्षणीक वातावरण पाहून समाधान व्यक्त केले.
बिलोली तालूक्यातील गुणवंता व पटसंख्या तसेच शासनाचे विविध उपक्रम राबविण्या बाबत ज्या शाळेचा वारंवार गुण गौरव केला जातो.अशी शाळा म्हणजे आर्जापूर येथील जि.प.प्राथमिक शाळा नुक्तेच या शाळेस प्रत्येक्ष दतात्रय मठपती शिक्षण उपसंचालक लातूर, तसेच उपसंचालक कार्यलयातील अधिकारी देशपांडे यांनी अचानक भेटी दिली.
या भेटीत शाळेतील एकूण पटसंख्या १८५ पैकी१५५ विध्यार्थी उपस्थित होते.तसेच डिजीटल वर्ग,तसेच प्रांगणात व प्रांगणातील वृक्षारोपण आदींची पहाणी करून समाधान व्यक्त केले.
यावेळी प्राशाचे मुख्याध्यापक शेख सलीम खुर्शीद अहेमद यांच्या वतीने वान्यवरांचा सत्कार करण्यात आले.
त्यांचे सहकारी शिक्षक विठ्ठल नवाथे,दिगंबर मरकंटे,शेख साजिद कुंडलवाडीकर, श्रीमती.सत्नमाला गायकवाड,सौ.निर्मला सोमपूरे,सौ.उमाताई खिसे आदी उपस्थित होते.