नांदेड : प्रसिद्ध सिने कलाकार राजकपूर यांनी राम तेरी गंगा मैली हो गयी… या शिर्षकाखाली एक सुंदर चित्रपट काढला होता. केंद्रात भाजप सरकार येताच गंगेला पवित्र समजून स्वच्छ करण्यात आले. त्यानंतर गंगेचे नाव जगभरात पोहंचले. परंतु नांदेडकरांची गोदावरी नदी मात्र अनेकवेळा तक्रारी करुनही अद्यापही स्वच्छ झाली नाही. एका जानकार नागरिकाने गंगेत जाणा-या दुषित पाण्याचा व्हिडिओ व्हायरल केला. याची दखल घेत मनपा आयुक्त लहाने यांनी तात्काळ दुरुस्तीचे आदेश दिले असले तरी गंगेसंदर्भात असेच म्हणावे लागेल की, व्यथा नांदेडकरांची कथा महापालिकेची.
गोदावरी स्वच्छ करण्यासाठी राज्य शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी महापालिकेला वर्ग करण्यात आला. तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी गोदावरी नदीची पाहणी केल्यानंतर अधिका-यांना फैलावर घेत महापौर व आयुक्तांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. गुन्हे दाखल झाले तरीपण महापालिकेने आजतगायत दखल घेतली नाही. आजही गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा होतो. मलनिस्सारणचे पाणी बिनदिक्कतपणे सोडल्या जाते. नदी परिसरात फेरफटका मारला असता नाकाला रुमाल बांधूनच फिरावे लागते. गुरु ता गद्दी सोहळ्या निमित्ताने नांदेडच्या सर्व नदी घाटांचे सुशोभीकरण करण्यात आले. जेणे करुन सायंकाळी व सकाळी नागरिकांन फेरफटका मारता यावा, नदीपात्रातील पाण्याचा आनंद घेता यावा यासाठी घाटांचे सुशोभीकरण करण्यात आले असले तरी नदी मात्र स्वच्छ होत नसल्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करुन सुशोभीकरण केल्याचा फायदा नांदेडकरांना घेता येत नाही.
नदी पात्रात जवळपास १७ ते १८ नाले जोडण्यात आले आहेत. काही ठिकाणी ड्रेनेजचे चेंबर्स करण्यात आले परंतु या चेंबरची देखभाल होत नसल्याने शहरातील मलनिस्सारणचे पाणी नदी पात्रात जात आहे. या पात्रात आलेले मासे देखील काही दिवसापुर्वी मृत झाले होते. यासंदर्भात आजपर्यंत महापालिकेकडे जबाब नाही. शनिमंदिर परिसरात शुद्धीकरणासाठी कामकाजास सुरुवात झाली परंतु काही दिवसातच कामकाज बंद करण्यात आले. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांनी ओरड करुनही महापालिका दुर्लक्ष करीत आहे. यासाठी आता दस्तूरखुद्द महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहान यांनी लक्ष देण्याची वेळ आली आहे. लहानेंनी लक्ष न दिल्यास असेच म्हणावे लागेल की, व्यथा नांदेडकरांची कथा महापालिकेची.
शेतकरी आंदोलनाला परदेशातील खासदारांचा पाठिंबा