22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeनांदेडसगरोळीत घरात पाणी शिरुन अन्न धान्याचे नुकसान तर कोटग्याळचा संपर्क तुटला

सगरोळीत घरात पाणी शिरुन अन्न धान्याचे नुकसान तर कोटग्याळचा संपर्क तुटला

एकमत ऑनलाईन

बिलोली (दादाराव इंगळे) : सोमवार पासुन सुरु झालेल्या पावसामुळे बिलोली तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली तर अनेकांचे संसार उध्वस्त झाले,यात सोयाबीन पिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गेल्या चोविस तासा पासुन चालु असलेल्या मुसळधार पावसामुळे बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरा सह पिकाचे नुकसान झाले आहे यात सगरोळी येथील घरात पाणी घुसून माधव सायबु गोनेकर यांच्या घरातील अन्न,धान्यासह आदी संसार उपयोगी वस्तुचे मोठे नुकसान झाले,घरात गुडग्या पर्यंत पाणी साचुन यांच संसार उघड्यावर पडले,यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी गावक-यानी केली आहे.

तर दुसरीकडे कोटग्याळ जवळ गुत्तेदाराच्या हलगर्जी पणामुळे अजुनही पुलाचे काम न झाल्याने परिसरातील कुंडलवाडी, कोटग्याळ, माचनुर, गंजगाव, दौलापुर सह आदी गावांचा संपर्क तुटला आहे रोडवर सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे पुल तात्काळ बांधावा म्हणून पंधरा दिवसा पुर्वीच कोटग्याळ च्या सरपंचानी या विभागाचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या कडे मागणी केली होती.सध्या शेतात असलेल्या सोयाबीन या पिंकाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने पंचनामे करुन भरपाई देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

आग्र्यातील मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव – योगी आदित्यनाथ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या