27.3 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeनांदेडधर्माबाद येथील वन पर्यटन क्षेत्राचे काम लवकरच करू

धर्माबाद येथील वन पर्यटन क्षेत्राचे काम लवकरच करू

एकमत ऑनलाईन

धर्माबाद : येथे मंजूर वन्य पर्यटन स्थळाला तात्काळ निधी उपलब्ध करून देणे साठी भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीचे तात्कालीन सरकार असताना व तात्कालीन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी , जिल्हा वनसंरक्षक गरड व के डी देशमुख आर एफ ओ हे असताना रविंद्र पोतगंटीवार वारंवार या विषयाचा पाठपुरावा केला होता मात्र सरकार बदलल्यानंतर निधी खोळबला पुन्हा भाजपा व शिदें सरकार आल्यांनंतर शिष्टमंडळाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेवुन वन पर्यटन साठी निधीची मागणी केली.

आता त्यांनी तातकाळ निधी देण्याचे आश्वासन देवुन वन पर्यटन क्षेत्राचे काम लवकरच करू असे वनमंत्री मुनगंटीवार यांनी सागीतले़ त्यांच्याकडे करून धमार्बाद येथील वनविभागाच्या जमिनीत वन पर्यटन क्षेत्रासाठी प्रयत्न केले होते त्यावेळी ते मंजूरही झाले व त्याचे उच्चस्तरीय नागपूर येथील अधिका-्यांनी येऊन पाहणी करून विकास आराखडा तयार करून कामात सुरुवात ही केली होती परंतु त्यानंतर सरकार बदलले व हे काम असेच थांबले होते़.

परंतु नुकत्याच महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन नंतर सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडेच वनमंत्री हे महत्त्वाचे खाते आल्यामुळे पुन्हा तेच या विषयाला न्याय देऊ शकतील ह्याशेने धमार्बाद येथील रविंद्र पोतगंटीवार, शिवराज गाडीवान ,अशोक वडजे पिराजी चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने नामदार मुनगंटीवार साहेबांची भेट घेऊन सदरील बाब त्यांच्या स्मरणात आणुन दिली.

धर्माबाद तालुक्यामध्ये वन विभागाची जमीन मौजे बाळापुर ११९.०० हेक्टर व मौजे रत्नाळी येथे ६.०० हेक्टर एवढी संरक्षित जमीन आहे. यापैकी १०९.०० हेक्टर जमिनीला वन्य पर्यटन स्थळ म्हणून तात्कालीन वनमंत्री असताना मान्यता दिलेली आहे. व त्यासाठी अंदाजपत्रक सुद्धा तयार झालेले आहे पण अंदाजपत्रकाप्रमाणे निधी उपलब्ध करून दिला गेला नाही. धमार्बाद परिक्षेत्रातील धमार्बाद पासून ११ किलोमीटरवर असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक परमपूज्य डॉ. हेडगेवार यांचे जन्मस्थळ व धमार्बाद पासून आठ किलोमीटरवर असलेल्या तेलंगणातील श्रीक्षेत्र बासर या ठिकाणी येणा-्या देशभरातील भाविक भक्तांचा व असंख्य पर्यटकांचा ओघ चालूच असतो त्यामुळे धर्माबाद येथे वन्य पर्यटन स्थळास मंजुर केलेला निधी तात्काळ दिला तर धर्माबदच्या वैभव मध्ये भर पडेल व तत्कालीन वनमंत्री असताना मंजूर केलेला हा निधी तात्काळ वर्ग करून कामात सुरुवात करावी व तसेच तालुक्यामध्ये मोर हरिण इत्यादी प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत.

त्यांचेही संवर्धन यानिमित्ताने होईलच, तरी तात्काळ या सर्व बाबीचा आपण विचार करून निधी मंजूर करावा़ अशी मागणी वनमंत्री मा ना सुधीर मुनगंटीवार यांना केली.तात्काळ सुधीर भाऊ नी संबंधित अधिका-्यांना आदेशित करून वन्यपर्यटन धमार्बाद संदर्भात तपासणी करून लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश दिले. धर्माबाद च्या शिष्टमंडळाला भरघोस निधी देण्याचे मा ना सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी आश्वासन दिले. धमार्बाद च्या शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष रविंद्र पोतगंटीवार , जिल्हा प्रवक्ते शिवराज पाटील गाडीवान अशोक वडजे पिराजी पाटील होते.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या