23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeनांदेडगौराईचे उत्साहात स्वागत

गौराईचे उत्साहात स्वागत

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्याभरात मोठ्या उत्सहात गणरायाचे आगमन झाल्यानंतर महालक्ष्मीच्या सणाची लगबग सुरू झाली होती. रविवारी गौरी आवाहनानंतर आज सोमवारी महालक्ष्मी महापुजा तर मंगळवारी गौरी विसर्जन होणार आहे. याची गेल्या दोन दिवसापासुन महिलांनी जय्यत तयारी केली होती.

कोरोनाच्या संकटामुळे सर्वच सण,उत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे.मागील वर्षभरात तर सर्वच सण घरातच साजरे करावे लागले.आता मात्र कोरोनाचे संकट काहिसे कमी झाल्याने नियमांचे बंधन टाकुन सार्वजनिक स्वरूपा ऐवजी गर्दी न करता सण साजरे करण्यास मुभा मिळाली आहे.यामुळे गणरायाच्या आगमनानंतर भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.महालक्ष्मीच्या सणाची मागील दोन दिवसापासुन महिलांनी मोठी तयारी सुरू केली होती. रविवारी गौरी आवाहनानंतर रात्रभर जागरण करून मखर सजावट, महालक्षीम्यांना शृंगार, वस्त्र परीधान केले जातात.

दरम्यान रविवार दि. १२ रोजी सायंकाळी मंगलमय वातावरणात गौराईचे आगमन झाले असुन, तिच्या स्वागतासाठी सोन्याच्या सोनपावलाने महालक्ष्मी जेष्ठा आणि कनिष्ठेच्या रूपात सजवलेल्या मखरात आज महालक्ष्मी विराजमान झाल्या आहेत. दरम्यान मागील दोन दिवसापासुन महिलांनी बाजारपेठेत महालक्ष्मी सणानिमित्त खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. या सणाला सुहासिनीचा महत्वाचा सण म्हणून ओळखले जाते. गौरी आवाहानानंतर दोन दिवस चालणा-या या सणाला महिला एकमेकांच्या घरी जावुन सुहासिनीचे प्रतिक असलेले हळदी कुं कू लावुन स्वागत करत असतात. दरम्यान या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गत वर्षीच्या तुलनेत यंदा महालक्षीम्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या