18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeनांदेडकौन बनेगा महापौर

कौन बनेगा महापौर

एकमत ऑनलाईन

नांदेड : नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या महापौरपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ आहे. परंतु सर्वांना संधी मिळावी याअनुषंगाने नांदेड कॉंग्रेसचे सर्वेसर्वा ना. अशोकराव चव्हाण यांनी सव्वा सव्वा वर्षाचा पायंडा पाडला आहे. त्यानुषंगाने मोहिनी येवनकर यांना नुकतेच एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे महापालिकेत कौन बनेगा महापौर या चर्चेला उधान आले आहे. येणा-या ३0 सप्टेंबर रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्यात येणार असून या सभेत आयत्यावेळी हा विषय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्यापही कॉंग्रेस पक्षाकडून कुठलेही संकेत प्राप्त झाले नसले तरी ना. चव्हाण यांच्या पायंड्यानुसार नवीन महापौर महापालिकेत विराजमान होतील असे सांगितल्या जात आहे.

महापालिकेच्या विद्यमान महापौर मोहिनी विजय येवनकर यांना अडिच वर्षाच्या अनुषंगाने पहिल्या सव्वा वर्षासाठी संधी देण्यात आली होती. उर्वरित सव्वा वर्षात जयश्री पावडे यांना महापौर पदाची संधी देण्याचे निश्चीत करण्यात आले होते असे सांगण्यात येते. निवडणुकीचा कालावधी असल्यामुळे बोलका चेहरा नांदेडकरांसमोर यावा यासाठी त्यांना दुस-या सत्रात संधी देण्यात यावी असा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितल्या जाते. त्यानुषंगाने जयश्री पावडे या महापौरपदी विराजमान होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मागील अडीच वर्षाच्या काळात शिला भवरे आणि दिक्षा धबाले यांना महापौरपदाची संधी मिळाली होती. त्यांनी देखील सव्वा सव्वावर्ष पद उपभोगले होते. त्यानंतर सध्या महापौरपद हे ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे. महापालिकेत या स्पर्धेत अनेकजण असले तरी जयश्री पावडे यांचे नाव निश्चीत झाल्याचे भाकित केले जात आहे. कोरोना कालावधी असतांनाही मोहिनी विजय येवनकर यांनी अनेक विकासात्मक कामाकडे लक्ष वेधले होते. नवीन वास्तु शहरात निर्माण व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न राहिले. महापालिका अंतर्गत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात त्यांना यश प्राप्त झाले. आरोग्य विभागावर चांगलीच वचक त्यांनी निर्माण केली होती. महापालिकेकडून सर्व सुविधा उपलब्ध करुन देत २00 खाटांचे विशेष रुग्णालय देखील त्यांनी उभारले होते. ऑक्सीजनची कमतरता भासू नये यासाठी प्रयत्न केला होता. त्यांच्या वर्षभराच्या कारकिर्दीबाबत त्या समाधानी असल्याचे सांगितल्या जाते.

जयश्री पावडे या अनुभवी जि.प. सदस्या व नगरसेविका आहेत. त्यांची कारकिर्द जिल्हा परिषदेत चांगलीच गाजली. धडाडिच्या व निर्णय क्षमता असणा-या म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख आहे. नजिकच्या काळात महापालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौर देखील बोलका पाहिजे. या अनुषंगाने ना. चव्हाणांनी त्यांना दुस-या सत्रात संधी देण्याचे आश्वासीत केले होते. त्यामुळे जयश्री पावडे या महापौर होतील असे भाकित केले जात आहे. ३0 सप्टेंबरच्या सर्वसाधारण ऑनलाईन बैठकीनंतर महापालिका महापौरपदी कोण विराजमान होणार हे स्पष्ट होणार असले तरी सर्वांचे लक्ष पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या शब्दाकडे लागले आहे.

ना. चव्हाणांचा शब्द अंतिम : विजय येवनकर
नांदेड कॉंग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष विजय येवनकर यासंदर्भात प्रतिक्रिया देतांना स्पष्ट केले की, आम्ही ना. चव्हाण यांच्या जडणघडणीतून तयार झालो. त्यांच्यामुळेच माझ्या पत्नीला महापौरपदी विराजमान होता आले. एक वर्षाच्या कालावधीत होईल तेवढे चांगले काम करण्याचा प्रयत्न आमचा राहिला. भविष्यातही महापालिकेच्या विकासात आमचा हातभार निश्चीत राहणार. ना.चव्हाण जो आदेश देतील तो आपल्याला मान्य राहणार आहे. आजतगायत महापौरपदी आम्ही आहोत. जोपर्यंत या पदावर आहे तोपर्यंत सामान्य जनतेचा प्रश्न सोडविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे तसेच पदावर नसलो तरी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कायम तत्पर राहणार असल्याचे शेवटी ते म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या