34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeनांदेडबेड देता का हो बेड.. रुग्णाचा टोहो!

बेड देता का हो बेड.. रुग्णाचा टोहो!

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोनाविषाणुने जिल्ह्यात कहर केला असुन बेड वेळेवर मिळत नसल्याने अनेक कोरोना रुग्णांना ताटकळत बसावे लागत आहे बेड देता का हो बेड अंशी केविलवाणा मागणी गरीबी कोरोना रुग्ण सध्या नांदेड मध्ये करीत आहेत सरकारी रुग्णालयात पासून खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे रविवारी सोशल मीडिया वर एक पोष्ट व्हायरल झाली असून त्यात बेड मागणी साठी केविलवाणा मागणी करण्यात आली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ होत असून त्या पार्श्वभूमीवर आता खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णावर उपचार करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांना गतवर्षी प्रमाणेच उपचारासाठी दवाखान्यात चकरा माराव्यात लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. गेल्या आठवड्याभरापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून त्यामूळे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ११ दिवसाचा कडक लॉकडाऊन लागू केला आहे. तर कोरोना उद्रेक रोखण्यासाठी जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना देखील कोरोनाची चाचणी आणि कोरोना रुग्णावर उपचार करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. मात्र याचा आता उलट परिणाम होताना दिसत आहे.

गतवर्षी अनेक ठिकाणी खासगी रुग्णालयात कोरोनाच्या धास्तीने सामान्य रुग्णावर उपचार न झाल्याच्या तक्रारी आपण पाहिल्यात. तशीच काहीशी परिस्थिती यंदाही दिसून येत आहे. यंदा खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी परवानगी दिल्याने खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोविड-१९ चे रुग्ण घेतल्या जात आहेत. कारण ऐका कोरोना रुग्णाचे सरासरी अंतिम बिल हे एक लाख रुपयांच्या वरच जात आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात प्रथम कोरोना पॉझिटिव्ह रुग्णालयात प्राधान्य दिले जात आहे. अशात मात्र सामान्य रुग्ण जर एखाद्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेला असता. त्याकडे बघायलाही कोणी तयार नसल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.

तासन तास सामान्य रुग्णांचे नातेवाईक रुग्ण घेऊन ताटकळत रुग्णालयाबाहेर उपचारासाठी डॉक्टरकडे विनंत्या करत आहेत. मात्र कमी वेळेत अधिक पैसे कमविण्यासाच्या लालसेपोटी काही खासगी डॉक्टर उडवाउडवीची उत्तर देत सामान्य रुग्ण अ‍ॅडमिट करून घेणे टाळत आसल्याचे दिसुन येत आहे. एकूणच पाहता जर अशीच परिस्थिती जिल्ह्यात राहिली तर ज्या पद्धतीने कोरोना रुग्णांचे मृत्यू होताहेत त्याचप्रमाणे उद्या सामान्य रुग्णांचे जर उपचाराअभावी मृत्यू झाले तर नवल वाटायला नको.

 

औरंगाबादमध्ये अंत्यसंस्कारासाठी माणसांचीच वानवा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या