29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeनांदेड‘स्वारातीम’ विद्यापीठांतर्गत हिवाळी-२०२० परीक्षा लॉकडाऊनमुळे स्थगित, सुधारित वेळापत्रक जाहीर होणार

‘स्वारातीम’ विद्यापीठांतर्गत हिवाळी-२०२० परीक्षा लॉकडाऊनमुळे स्थगित, सुधारित वेळापत्रक जाहीर होणार

एकमत ऑनलाईन

नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत सध्या हिवाळी-२०२० च्या परीक्षा चालू झाल्या होत्या. महाराष्ट्र शासनाने कडक संचारबंदीचा निर्णय घेतल्यामुळे १२ एप्रिल आणि १५ एप्रिल पासून सुरु झालेल्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५ मे नंतर सुधारित वेळापत्रक जाहीर करून त्यानुसार पुढील परीक्षा घेण्यात येण्यार आहेत असे विद्यापीठाकडुन कळविण्यात आले आहे.

कोव्हीड-१९ विषाणूच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे शासनाने कडक निर्बंध लावून संचारबंदी लागू केली आहे. यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विविध अभ्यासक्रमाच्या हिवाळी- २०२० परीक्षा ६ एप्रिल पासून सुरू झालेल्या आहेत. व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या या वेळापत्रकानुसार एक दोन विषयाचे जे पेपर शिल्लक आहेत. केवळ त्याच शिल्लक राहिलेल्या विषय पेपरच्या परीक्षा होणार आहेत.

पण पदवी, पदव्युत्तर अथवा क्लस्टर परीक्षा व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमामधील ज्या परीक्षा १२ एप्रिल पासून सुरू झाल्या व १५ एप्रिलपासून सुरू होणार होत्या त्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. याबाबतीत सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ५ मे नंतर जाहीर करण्यात येईल व त्यानुसार पुढील परीक्षा घेण्यात येतील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र-संचालक डॉ. वसंत भोसले यांनी कळविले आहे. ब-याच दिवसापासून विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालुन परिक्षा घेऊ नका म्हणून अग्रही होत्या, विद्यापीठीय सर्व परिक्षा पुढे ढकला म्हणून नसोसवायएफ या विद्यार्थी संघटनेने कुलगुरू यांना या बाबत ऑनलाईन विनंती निवेदन ही दिले होते.सदरील परिपत्रक निर्देश हे सर्व संलग्नित महाविद्यालये., प्रस्तुत विद्यापीठ, प्राचार्य/तथा क्लस्टर हेड महाविद्यालय, लातूर व परभणी, उपकेंद्र, न्यु मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली, समन्वयक, कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास संशोधन केंद्र, किनवट यांना लागू आहेत.

 

लातूर जिल्हयात पूरेशा प्रमाणात रेमडेसीवीर औषध उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या