22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeनांदेडदादांच्या काँग्रेस पुनर्एन्ट्रीने साहेबांच्या निष्ठावंतात चलबिचल

दादांच्या काँग्रेस पुनर्एन्ट्रीने साहेबांच्या निष्ठावंतात चलबिचल

एकमत ऑनलाईन

नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीच्या ऐन तोंडावर भाजपाला जय श्रीराम करित काँगे्रस पक्षात पुर्नएंन्ट्री केली आहे.ही पक्ष व नातेसंबधासाठी जमेची बाजू असली तरी गेल्या सात वर्षापासून अनेक विषयातील निर्णय घेण्यासाठी महत्वाची भुमिका निभावणा-या साहेबांच्या शिवाजीनगरातील निष्ठावंत पदाधिका-यांत चलबिचल सुरू झाल्याची चर्चा होत आहे.मात्र देगलूर पोटनिवडणूकीत झेंडा फडकवण्यात ज्याची महत्वाची कामगिरी असेल तोच वरचढ ठरेल असे बोलले जात आहे.

काँग्रेसचे जुने नेते दादा तथा माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी अनेक पदे भुषविली.मात्र सन २०१४ च्या निवडणूकीनंतर सर्वप्रथम काँगे्रस नेत्यावर नाराजी व्यक्त करित भाजपात प्रवेश केला.भाजपात जातात प्रदेश उपाध्यक्ष पद पदरात पाडून घेतले.एवढेच नव्हे तर आपले निवासस्थान भाजपाचे केंद्र बिंदु करून काही वर्ष जिल्हयातील भाजपाची सुत्र आपल्या हातात घेतली.परंतू भाजपकडून खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी काँगे्रसचे नेते पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचा पराभव करून विजय मिळविला.तेव्हापासून दाजी,भावजीत दुरावा निर्माण झाला.तर दुसरीकडे खतगावकर यांचे वजन कमी होऊन खा.चिखलीकरांचे निवासस्थान भाजपाचे केंद्र बिंदु झाले.तसे दादांची नाराजी वाढत गेली.

अखेर या नाराजी नाट्यानंतर दादांनी खा.चिखलीकरांवर एकाधिकारशाहीचा आरोप करित भाजपाला जय श्रीराम करित काँगे्रस पक्षात पुर्नएंन्ट्री केली आहे. मुळात पुर्वी दादांचे काँगे्रसमध्ये बरेच वजन होते.अनेक निर्णय त्यांना विचारून अथवा त्यांच्या स्तरावर घेतले जात होते.मध्यंतरीच्या सात वर्षाच्या कार्यकाळात हे चित्र बदलून शिवाजीनगरातील साहेबांच्या समर्थक पदाधिका-यांचे चांगलेच वजन वाढले.यामुळे अनेक निर्णय घेण्यात ते फिरविण्यात महत्वाची भुमिका होती.परंतू आता दादांच्या काँगे्रस पुर्नएंन्ट्रीने अनेक जण हादरले आहेत.दादांची एंन्ट्री पक्ष व नातेसंबधासाठी जमेची बाजू असली तरी साहेबांच्या समर्थक पदाधिका-यांत आता आपले काय होणार.आपल्याला निर्णय घेता येतील की नाहीक़ा दादांनी सांगीतले ते करावे लागेल या भितीने चलबिचल सुरू झाली आहे,अशी चर्चा होत आहे.

या चर्चेमुळे कार्यकर्तेही संभ्रमात पडले आहेत.याबाबत साहेबच काय भुमिका निभावतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तर देगलूर विधानसभेवर काँगे्रसचा झेंडा फडकवण्यासाठी कोण महत्वाची कामगिरी करिल तोच साहेबां पुढे वरचढ ठरेल असे बोलल्या जात आहे. दरम्यान आ.रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या चिरंजीवाला उमेदवारी देऊन विधान परिषद आमदारांनी अंतापूरकर यांच्यावरील आपला हक्क सिध्द केला. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात दादांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतांना पुर्वी जसे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधीचे हक्क आपल्याकडे ठेवले होते.त्या पद्धतीने कॉंग्रेसच्या उमेदवाराला निवडूण आणायचे त्यांच्या निधीचे हक्क आपणाकडे ठेवण्याच्या करार करून खतगावकर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या