24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeनांदेडमहिलांनी विशेषत: योगाला प्राधान्य द्यावे

महिलांनी विशेषत: योगाला प्राधान्य द्यावे

एकमत ऑनलाईन

कंधार : निरोगी, निरामय राहण्यासाठी सर्वांनी योग करावा. विशेषत: महिलांनी दिवसातून जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा योग करण्यासाठी एक तास तरी काढावा. योग केल्यामुळे मन प्रसन्न राहते व मन एकाग्र होते. रोगापासून मुक्ती मिळते. त्यासाठी योग करणे काळाची गरज असल्याचे कंधारचे जिल्हा न्यायाधीश माधवी आनंद मॅडम यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील जिल्हा न्यायालयात दि. २१ रोजी व्याख्यानचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. दिवाणी न्यायाधीश वरीष्ठस्तर आर.आर. राऊत, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर आर. ए. ए. खतीब मॅडम, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर पी. डी. आझादे, योगगुरू नीलकंठ मोरे, अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अड. बी. टी. राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी योगगरू नीलकंठ मोरे म्हणाले की,
योग प्राणायमाने मन प्रसन्न तर होतेच शरीर पण सुदृढ होऊन सर्व रोगांची दारे बंद होतात. कोणताही रोग आपल्याला स्पर्श करत नाही. रक्तदाब असो, शुगर असो, कॅन्सर सारखे असाध्य रोग सुद्धा कमी होतात. शरीरावरची अनावश्­यक चरबी कमी होऊन वजन कमी होते. तारुण्य दीर्घकाळपर्यंत टिकून राहते. ज्याप्रमाणे शरीराला अन्नाची गरज असते त्याचप्रमाणे सध्याच्या धकाधकीच्या जीवनात योग प्राणायमाची नितांत गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

योगगुरू मोरे पुढे म्हणाले की, योगामुळे स्मरणशक्ती वाढते. मनोविकृती दूर होते. ताण- तणावातून मुक्ती मिळते. रोग प्रतिकार शक्ती वाढते. पोट, यकृत, मुत्राशय, लहान व मोठे आतडे, पचनसंस्था कार्यक्षम बनतात. शरीरातील नाड्या शुद्ध होतात. नियमित सरावाने जठराग्नी प्रदीप्त होते. श्वसन संस्थेच्या कार्यक्षमतेत वाढ होते. एवढ्या गोष्टी जर योग- प्राणायमामुळे शक्य होत असतील तर कोणताही रोग व कोणताही संसर्ग होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. अड. अनिल डांगे यांनी योग काळाची गरज असल्याचे आपल्या भाषणातून सांगितले. अड. अभय देशपांडे यांनी सुत्रसंचलन केले तर आभार अड. दिगंबर गायकवाड यांनी मानले.

यावेळी जेष्ठ विधिज्ञ अड. बी. के. पांचाळ, अड. श्याम पांगरेकर, अड. के एस. क्षीरसागर, अड. के. एस. बेग, सरकारी वकील पाटील मॅडम, अड. महेश कागणे, अड. एन. एस. राठोडकर, अड. रवी केंद्रे,अड. मारोती पंढरे, अड. सुहास मस्के, अड. हफीज घडीवाला, अड. श्रेयस धर्मापुरीकर, अड. वर्षाराणी जोंधळे, अड. देऊळगावकर मॅडम, अड. पल्लवी कांबळे, अड. सुप्रिया उमरजकार, अड. सागर डोंगरजकर आदी उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी साडेसात वाजता न्यायालय प्रांगणात योगगुरू मोरे यांनी एक तास योग-प्राणायमाचे प्रात्यक्षिके करून दाखवले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या