36.1 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeनांदेडदेशी दारू दुकानासमोर महिलांचे ठिय्या आंदोलन

देशी दारू दुकानासमोर महिलांचे ठिय्या आंदोलन

एकमत ऑनलाईन

धमार्बाद : तालुक्यातील नायगाव ( ध) येथे देशी दारू दुकान अगदी तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असून सदरील देशी दारू हटविण्याच्या मागणीसाठी गावातील महीलांनी देशी दारू दुकानावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.सोमवारी तहसिलदार शिंदे व पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांची भेट घेऊन सदरील देशी दारू दुकान हटविण्याची लेखी मागणी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, धमार्बाद तालुक्यातील नायगाव (ध) येथे आमदार राजेश पवार यांचे कट्टर समर्थक तथा बाजार समितीचे संचालक,तालुका रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश गौड यांच्या मालकीची देशी दारू दुकान गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. सदरील देशी दारू दुकान हे तेलंगणा राज्याच्या अगदी सिमेलगत असून महाराष्ट्रातील देशी दारूला तेलंगणा राज्यात भरपूर मागणी असल्यामुळे सदरील दुकानातून दररोज तेलंगणा राज्यात देशी दारूची चढ्या भावाने विक्री करून आपले चांगलेभले करुन घेत आहेत.परंतु सदरील प्ररकरणाकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत.

तसेच तेलंगणा राज्यातील असंख्य तळीराम देशी दारू पिण्यासाठी नायगाव मध्ये दररोज ये-जा करीत असल्याचे चित्र दिसत आहेत.व गावातील तरूण,मंजूर व शेतकरी गावतच देशी दारूचे दुकान असल्यामुळे सकाळ पासूनच देशी दारू पिऊन कर्जबाजारी होत आहेत.तसेच अनेक गोर गरीब लोकांचे संसार उद्धवस्त होत आहेत.व गावात दररोज लहान मोठे तंटे देशी दारू पिल्यानंतर होत असल्याचे चित्र दिसत आहेत.सदरील देशी दारूच्या जवळच मंदीर व शाळा असल्यामुळे शाळकरी मुलांना व भाविकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.तसेच तेलंगणा राज्यात दररोज देशी दारू काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी ठरविक माणसे नेमलेले आहेत.

आजपर्यंत आती देशी दारू पिल्यामुळे गावातील अनेकांचा मुत्यु झाला आहे.त्यामुळे त्यांचे संसार उद्धवस्त होत असल्याचे चित्र गावातील रणरागिणींच्या निदर्शनास येताच,त्यांनी सदरील देशी दारू दुकान हटविण्याचा संकल्प केला आहे. व सदरील देशी दारू दुकानावर गावातील शेकडो महीलांनी मोर्चा काढून सदरील देशी दारू दुकान हटविण्याची मागणी करीत दुकानासमोर महीलांनी ठिय्या आंदोलन केले आहे.परंतु पोलिसांनी महीलांची समजूत घातल्यामुळे काही अनुचित प्रकार घडला नाही.लगेच गावातील असंख्य महीलांनी धमार्बाद गाठून येथील तहसिलदार शिंदे व पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांची भेट घेऊन सदरील देशी दारू दुकाना संदर्भात पाढा वाचला.व सदरील देशी दारू दुकान हटविण्याची लेखी मागणी केली आहे.

सदरील देशी दारू दुकानाच्या मालका विरोधात महीलेमध्ये संतापाची लाट उसळली असल्याचे चित्र दिसत आहे.सदरील देशी दारू दुकानदार आपले काळे धंदे सुरळीत सुरू राहवे,यासाठी आ राजेश पवार यांच्याशी घनीष्ठ संबंध निर्माण करून आमदाराचे विश्र्वास संपादन केल्यामुळे आमदार राजेश यांनी सदरील देशी दारू दुकानाच्या मालकास तालुका रुग्ण कल्याण समितीचे सदस्यपदी निवड केल्यामुळे भाजपातील निष्ठावंतांनी त्यावेळेस नाराजी व्यक्त केली होती. परंतु सदरील रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश गौड जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याऐवजी गोर गरीब जनतेचे संसार उद्धवस्त करीत असल्याची चर्चा तालुक्यातील जनतेत होत आहे. सदरील देशी दारू दुकानाच्या मालकास आमदार राजेश पवार यांचा वरदहस्त असल्यामुळे संबधित अधिकारी व कर्मचारी सदरील दुकानाच्या नियमबा परवाना व गैरकारभाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.

परंतु सदरील देशी दारू दुकान हटविल्याशिवाय गावातील महीला सुध्दा शांत बसणार नाहीत.व यासाठी लवकरच जन आंदोलन करण्याची तयारी गावातील महीला करीत असल्याचे चित्र दिसत आहे.त्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिका-्यांनी लक्ष देऊन सदरील देशी दारूची दुकान हटवावे,अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे. यासंदर्भात रमेश गौड यांना भ्रम्नधव्नीवरून विचार पुस केल्यास म्हणाले की, सदरील देशी दारूच्या दुकानाचा परवाना नियमानुसारच असून माज्या आईच्या नावाने परवाना आहे. सदरील तक्रार राजकारणामुळे होत आहे.व यापुढे अनेक विषयांवर बोलण्यास टाळाटाळ केली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या