36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeनांदेडनागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट

एकमत ऑनलाईन

हदगाव : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे.पण या रस्त्याला हदगाव शहरापासून ते मनाठा पाटीपर्यंत जागोजागी मोठ- मोठे तडे गेले आहेत.यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट होत असल्याचा संशय खरा ठरत आहे.याकडे संबंधित विभागाचे साफ दुर्लक्ष होत असून लोकप्रतिनिधी चिडीचूप बसल्याचे दिसून येत आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून कोट्यावधी रुपये खर्च करून भविष्यातील वाहतुकीच्या दृष्टीने होत असलेल्या नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे गेल्या चार वर्षांपासून काम सुरू आहे. यामध्ये वांरगा ते हदगाव रस्त्याचे काम सदभावना कंपनीकडून विविध राज्यांतील कामगार ठेकेदारांच्या माध्यमातून जात करण्यासाठी बरडशेवाळा येथे आपले बस्तान मांडले आहे.सुरवातीला या कामाविषयी सर्व सामान्य माणसाला मोठे स्वप्न पहायला मिळाले.पण एक वषार्नंतर मालक दिल्लीत कंपनी गल्लीत झाल्याने या कामाचे सर्व नियोजन बिघडले.गेल्या चार वर्षापासून या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे.

मात्र काम कधी बंद तर कधी सुरू असल्याने कामावर संबंधित विभागासह लोकप्रतिनिधी अधिकारी यांनी या कामात लक्ष देण्याची गरज असताना चिडीचूप राहुन दुर्लक्ष केल्याने पुढे पाट मागे सपाट अशी अवस्था झाली आहे.राष्टीय मार्ग असल्याने वाहतूकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे.या महामार्गावरचे काम दर्जाहिन होत आहे. यामुळे हा रस्ता पावसाळ्यात वाहनांच्या वाहतुकीमुळे खड्डे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाने कित्येक वर्षांच्या दळणवळणाच्या सुविधेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले असताना ठेकेदारांच्या बेजबाबदारपणाने कळस गाठला असून बोगस कामाचा सपाटा लावला आहे.

इंजिनियर कंपनीचेच असल्याने सर्व काम कंपनीच्या मर्जी व सोयीनुसार केले जात आहे. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट रस्त्याला जागोजागी तडे गेले आहेत. कंपनीने सुरवातीला कोणतीच एक बाजू पुर्ण केली नसल्याने अपघातात कित्येक जणांना आपला जीव गमावला लागला तर जणांना विविध अडचणीला सामोरे जावे लागले.करार संपत येत असल्याने कंपनीने काम पूर्ण करीत आहे. याकडे संबंधित विभागासह लोकप्रतिनिधी अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

बरडशेवाळा येथील सदभाव कंपनीच्या कर्मचा-यांना राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची चौकशी केली असता आमचे काम वांरगा ते महागावपर्यंत असुन काम वेळेत पूर्ण करण्यासाठी अडचणी आल्या होत्या.ज्या ठिकाणी तडे गेले असतील त्या ठिकाणी पंधरा वर्षांपर्यंत दुरुस्ती करण्यासाठी आमच्या कंपनीने करार केला आहे असे उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे.

वालूरमध्ये वारसा स्थळांनी घेतला मोकळा श्र्वास

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या