24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeनांदेडमाहूरमध्ये नळ योजनेचे काम अनेक दिवसांपासून बंद!

माहूरमध्ये नळ योजनेचे काम अनेक दिवसांपासून बंद!

एकमत ऑनलाईन

माहूर : माहूर शहरातील वार्ड क्र.१३ लगत असलेल्या महामार्गाचे व नालीचे काम गेल्या अनेक दिवसांपासून धिम्या गतीने सुरु असून, येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे धिम्या गतीने चालू असलेल्या कामाची गती वाढवावी, अशी मागणी नगर परिषद मुख्याधिका-यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

याबाबत सागर (गोपू) महामुने यांनी निवेदन दिले आहे. सध्या माहूर शहरात महामार्गाचे काम सुरु आहे. सध्या सिमेंट रोडचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, नालीचे आणि या लगतच नळ योजनेच्या पाईपलाईनसाठी खोदकाम सुरु आहे. दोन महिने उलटूनही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात आसपास राहणा-यांना नळ योजनेच्या पाण्यापासून वंचित राहावर लागत आहे. सदर काम तातडीने पूर्ण करुन वार्डातील पाणी प्रश्न निकाली काढावा, असे महामुने यांनी निवेदनात म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या