21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडमागणी करूनही मजुरांना कामे मिळेणात

मागणी करूनही मजुरांना कामे मिळेणात

एकमत ऑनलाईन

वाई बाजार: कोरोना महामारीचा उपद्रव शमविण्यासाठी शासनाने लागू केलेल्या ताळेबंदीमुळे छोटे-मोठे कारखाने, कंपन्या, उद्योग धंदे बंद पडल्याची परिणिती आर्थिकस्थिती ढासळण्यात झाली. परिणामी मोठया प्रमाणात कामगार व कारागिरांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली. त्यामुळे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ग्रामीण भागात विविध योजनेच्या कामाला मान्यता दिली. मात्र स्थानिक प्रशासनाने गूत्तेदाराशी संगणनमत करून बहुतांश कामे मशीनच्या साह्याने उरकल्याने हातावर पोट असलेल्या मजुरांना कामेच मिळाली नसल्याची सत्यता जाणून व होणारी अनियमितता हेरून गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे यांनी सदरची कामे थांबविण्याच्या संबंधीतांना तोंडी सूचना दिल्या असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

माहुर तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वाई बाजारचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य हुसेन लक्ष्मण पाडसे व उद्धव नाईक यांचे नेतृत्वात वाई बाजारच्या रामा सुंगा उईके, शे.जावेद शे.ईसुफ, रमेश जयवंत आरके, धरमसिंग पवार यांचेसह ७९ नोंदणीकृत मजुरांनी दि.११ मे २०२० रोजी ग्राम पंचायत कार्यालय गाठून कामाची मागणी केली. मात्र काम मिळाले नसल्याने त्यांनी दि.२० मे २०२० रोजी ग्राम पंचायतीच्या माध्यमांतून सुरू असलेली मनरेगाची कामे ठेकेदारी पद्धतीने व जेसीबी मशीनने केल्या जात असल्या बाबत जिल्हाधिका-यासह सर्व संबंधीताकडे तक्रार केली होती. हा सर्व उठाठेव वाई बाजार जि.प.गटातील एका भागाचा आहे तर मुंगशी व रामपूर शिवारात शेततळे, एलबीएस व सार्वजनिक विहिरीचे काम जेसीबी मशीनने केल्याची तक्रार खुद्द कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष (ग्रामीण ) दत्तराव मोहिते या जबाबदार नेत्याने दि.४ जून रोजी माहूर पं.स.च्या गटविकास अधिका-यांना दिलेल्या तक्रारीतून केल्याने वानोळा जि.प.गटातही तिच री ओढल्या गेल्याचे गुपीत उघड झाले आहे.

भरीसभर वानोळ्याचे रहिवासी विष्णू उत्तम राठोड या व्यक्तीच्या नावे दोन जॉब कार्ड बनवून सन २००६ ते २०२० पर्यंत खाते क्रमांक बदलवून रक्कम उचलून शासनाची फसवणूक केल्याची गंभीर बाब लक्षात येताच गटविकास अधिका-यांनीच १५ फेब्रु. रोजी सर्वसंबंधीतांची सुनावणी घेतल्याने मोठे बिंग फुटले. त्यामुळे सर्वच कामाची चौकशी होणे क्रमप्राप्त आहे. मनरेगा कामा संदर्भात झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण चौकशी कराल का? असा प्रश्न सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पूजार यांना प्रत्यक्ष भेटून आमच्या प्रतिनिधीने केला असता रीतसर तक्रार आल्यास निश्चित चौकशी होणार असे आश्वासन दिले.

मनरेगा अंतर्गत या आर्थिक वर्षात वाई बाजार ग्राम पंचायतीने केलेल्या कामाची सत्यता जाणून घेण्यासाठी ग्रामविकास अधिकारी सी.बी.शिंदे यांचेशी संपर्क केला असता आपण कामे बंद केली होती, तरीही मस्टर कसे निघाले याचेच आपल्यालाही कोडे पडले असल्याचे त्यांनी सांगितल्याने गूढ अधिक वाढले आहे.

कुलसचिव पाटील यांनी परस्पर उचलले वाढीव वेतन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या