36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeनांदेडवाहतुकीच्या दरात वाढ केल्याशिवाय कामगारांनी ऊस तोडू नये

वाहतुकीच्या दरात वाढ केल्याशिवाय कामगारांनी ऊस तोडू नये

एकमत ऑनलाईन

नांदेड : राज्य शासनाने ऊस तोड वाहतुकीच्या दरात भरीव वाढ करुन कामगारांचे हित जोपासणारा कायदा केल्याशिवाय एकही ऊस तोड कामगार साखर कारखान्यावर न जाता असहकार आंदोलन सुरु करावे असे आवाहन माजी राज्यमंत्री आ. सुरेशअण्णा धस यांनी केले आहे. नांदेड येथे स्व.गोपीनाथराव मुंडे ऊस तोडणी मुकादम व वाहतुकदार व महाराष्ट्र राज्य श्रमीक ऊस तोडणी मजूर संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मुकादम संघटनेच्या संयुक्त चर्चासत्रात ते बोलत होते.

या चर्चा सत्राच्या अध्यक्षस्थानी नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर हे होते. प्रमुख पाहूणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर, आ. राम पाटील रातोळीकर, माजी आ.अविनाश घाटे, भाजपा जिल्हा संघटन सचिव गंगाधर जोशी, ऊस तोड कामगार संघटनेचे नेते दत्तोपंत भांगे, तात्यासाहेब घुले पाटील, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किशोर देशमुख, किसान मोचार्चे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे आदिंची उपस्थिती होती.

ऊस तोड मुकादमांना मार्गदर्शन करताना आ. धस म्हणाले, साखर महासंघाने आतापर्यंत ऊसतोड कामगार, वाहतुकदार, मुकादमांना बळीचा बकराच बनविला आहे. ऊस तोड कामगारांच्या हिताचा विचार न करता साखर कारखानदारांचेच हित जोपसाले आहे. राज्य शासनाने असंघटीत कामगाराप्रमाणे ऊस तोड कामगारांचे हित जोपासणारा कायदा करावा, ऊस तोड वाहतुकीच्या दरात दीडशे टक्के भाववाढ केलीच पाहिजे. कोरोना काळात ऊस तोड कामगारांचा ५० लाखांचा विमा काढल्याशिवाय एकाही कामगारांनी ऊस तोडण्यासाठी जावू नये असे आवाहन त्यांनी केले.

संपूर्ण राज्यभरातील ऊस तोड कामगारांच्या हितासाठी भाजपाने कंबर कसली आहे. नाशिकपासून ते नांदेडपर्यंतच्या दौर्‍यांत मुकादमांशी चर्चासत्राचे आयोजन करुन आपल्या हक्काच्या लढाईसाठी सज्ज राहण्याचा इशारा देण्यात येत असल्याचे आ.धस यांनी यावेळी सांगितले. ऊस तोड कामगारांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत भाजपा आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल. राज्याचे मुख्यमंत्री असताना कै.शंकरराव चव्हाण यांनी ऊस वाहतुकीच्या दरात ६२ टक्के एवढी भरीव वाढ केली होती. त्यानंतर स्वर्गिय गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ७०टक्क्यापर्यंत वाढ करण्यात आली आहे. वाढत्या माहागाईच्या काळात ही वाढ तुटपूंजी असल्यामुळे दीडशे टक्के भाव वाढ मिळाल्याशिवाय ऊसाचे एक टिपरुही तोडू नका असे आवाहन आ. धस यांनी केले.

‘टेएकोप्लानिन’ सध्या वापरल्या जाणा-या इतर औषधांपेक्षा दहापट प्रभावी -अशोक पटेल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या