धर्माबाद( प्रतिनिधी) : मौजे बाभूळगाव ता.धर्माबाद जि.नांदेड येथे जागतिक हात धुवा कार्यक्रम आयोजित करण्यात आला स्वच्छ भारत मिशन (ग्रामिन)अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छतेच्या विविध कार्यक्रमावयक्तिक स्वच्छतेसाठी हात धुणे हा एक महत्वाचा भाग आहे. 15 आक्टोबर हा दिवस दरवर्षी हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो.
तसेच बाभूळगाव येथे हात धुवा दिनाच्या संकल्पनेला धरून अन्न स्वच्छता हातधुण्याच्या महत्वाच्या वेळा. स्वयंपाक करण्यापूर्वी शौचालयाहून आल्यावर व जेवणापूर्वी झाडझुड केल्यानंतर बाहेर फिरून आल्यानंतर साबणाने हात धुणे आवश्यक आहे तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साबणाने स्वच्छ हात धुणे आवश्यक आहे गावातील नागरिकांना स्वच्छतेविषयी जाणीव जागृती होऊन सृद्दड व निरोगी आरोग्य लाभण्यासाठी सदरील कार्यक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमास गावचे सरपंच श्रीमती ,ललिताबाई मोरे उपसरपंच मधुकर पल्लेवाड ,गुलाब पाटील मोरे,मारोती पाटील कदम,संभाजी डोके,शाळेतीळ शिक्षक नरवाडे सर,महिला बचत गटाचे अध्यक्ष , सचिव गंगासागर शिंदे ,व गंगासागर पवार एम,एस, आर,एल, एम,चे तालुका व्यवस्थापक लक्ष्मी मरेवार,ग्रामसेवक सुषमा ढालकरी आदी उपस्थित होते.
शासनाकडून शेतक-यांना दिलासा मिळेल