26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeनांदेडवीज पडून तरुण शेतक-याचा मृत्यू

वीज पडून तरुण शेतक-याचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

मुखेड : वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटांसह मुखेड तालुक्यात रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. यात केरुर गावातील तरुण शेतक-याचा वीज पडून ठार झालाÞ तर अनेक जनावरे दगावली आहेत. ही घटना सोमवारी सकाळी ती उघडकीस आली.

तालुक्यातील केरुरजवळ भगनुवाडी गट क्र. २२७ च्या शेतातील शिवारात वीज पडुन तरुण शेतकरी ठार झाला तर खैरका गावातील जनावरे मृत्यूमुखी पडले. शेतात जागलीवर गेलेल्या या शेतक-यावर वीज पडल्याने मृत्यू झाला. मुखेड तालुक्यातील केरुर येथील शेतकरी बालाजी तेजेराव श्ािंदे (वय ४०) हे आपल्या भगनुरवाडीच्या गट क्र. २२७ च्या शेतातील शिवारात जागलीसाठी गेले होते. अचानक रात्री वा-यासह काही क्षणातच विजांच्या कडकडाटासह धो-धो पाऊस सुरू झाला.

पाऊस मोठा असल्याने पावसापासून बचाव करण्याच्या तयारीत असलेल्या बालाजी तेजेराव शिंदे (वय ४०) यांच्यावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी.१० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर तहसीलदार व पोलीस निरिक्षकांना या घटनेची माहिती देण्यात आली. या दोन्ही अधिका-यांनी आपल्या अधिनस्त कर्मचा-यांमार्फत घटनास्थळी जाऊन पंचानामा केला. बालाजी तेजेराव श्ािंदे यांचा मृतदेह मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून, उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस निरिक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. तर दुस-या एका घटनेत खैरका गावच्या शिवारात शंकर मोतीराम सुर्यवंशी यांच्या चार म्हशी ठार झाल्याची घटना घडली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या