24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeनांदेडहिमायतनगरात वीज पडल्याने युवा शेतकरी गंभीर जखमी

हिमायतनगरात वीज पडल्याने युवा शेतकरी गंभीर जखमी

एकमत ऑनलाईन

हिमायतनगर : मृगनक्षत्र लागून तीन दिवस ओलांडल्यानंतर हिमायतनगर शहर व तालुका परिसरात आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्या सह विजांचा कडकडाट होऊन पाऊस झाला. त्यादरम्यान शहरानजीक असलेल्या खडकी पांधन रोड वर वाशीकर यांच्या शेत शिवारात एका झाडावर वीज कोसळली तेव्हा तिथे उपस्थित असलेला युवा शेतकरी सुरेश परमेश्वर टोमके वय ३० ह्याचे अंग भाजल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

त्याच्यावर प्राथमिक उपचार हिमायतनगर येथील वानखेडे हॉस्पिटल येथे करण्यात आले त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले असल्याचे युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी यांनी सांगितले

याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक आठ जून रोजी मृगनक्षत्र लागून सुद्धा पावसाने हजेरी न लावल्याने अनेक शेतकऱ्यांनी आप आपल्या शेतात धूळ पेरणी करून शेती मशागतीची कामे पूर्ण करण्याची लगबग चालू करून पावसाची प्रतीक्षा पाहत असताना अचानकच दिनांक ११ जून च्या सायंकाळी अंदाजे पाच वाजता शहरासह तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन जोरदार पाऊस सुरू झाल.

तेव्हा खडकी पांदन रोड वरील वाशिकर यांच्या शेतातील एका झाडा वर वीज पडल्याने झाडा शेजारी उभा असलेल्या युवा शेतकरी सुरेश परमेश्वर टोमके वय ३० वर्ष यांचे अंग भाजल्याने तो गंभीर जखमी झाला तेव्हा त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यासाठी शहरातील वानखेडे डॉक्टर यांच्या हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले असल्याचे युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी यांनी सांगितले त्यामुळे या गरीब शेतकऱ्याची अगोदरच परिस्थिती हलाखीची असल्यामुळे शासना कडून त्याला पुरेशी आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा उपस्थित नातेवाईकांनी व्यक्त केली

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या