26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeनांदेडरेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू

रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नांदेड: एका २५ वर्षीय तरुणाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना, गुरुवार दि.५ मे रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास नांदेड रेल्वे स्थाकातील रेल्वे रुळावर घडली. या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे. मागच्या महिन्यात एका व्यक्तीने नांदेड रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या रेल्वेला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

सदर घटनेला महिना ही झाला नाही तर पुन्हा एकदा २५ वर्षीय तरुणाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. आनंद मारोती म्हेत्रे (वय २५) असे मयत तरुणाचे नाव आहे. सदररील घटना दि.५ मे रोजीच्या रात्री १०.३० वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकातील शिवाजीनगर ब्रिजच्याखाली रेल्वे रुळावर घडली. या प्रकरणी रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस अंमलदार सचिन निकाळजे हे करीत आहेत.

दरम्यान सदरील तरुणाने आत्महत्या केल्याचा पोलीसांनी संशय व्यक्त केला आहे. तर ही आत्महत्या नसून यात घातपात झाल्याचा संशय देखील नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी तर्क वितर्क लढवले जात असले तरी पोलीस दोन्ही बाजूनी घटनेचा तपास करीत असून, सत्य काय ते तपासाअंती समोर येईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या