नांदेड : शहराजवळील हस्सापूर पुलावरून गोदावरी नदी पात्रात एका ३० वर्षीय तरूणाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दि.१७ रोजी घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माधव राहूल कानोरे (३०) रा.देगावचाळ नांदेड असे मयत तरूणाचे नाव आहे. माधव मागच्या काही दिवसापासून तणावात राहात होता. या दरम्यान तो दि.१७ रोजी घरातून निघून गेला यानंतर सदर तरूणाने हस्सापुर येथील गोदावरी नदी पात्रात असलेल्या पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्या मागचे मुळ कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी अरविंद मस्के यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.